Join us

"हॅपी दिवाली" म्हणत सलमानने शेअर केला कतरिनाबरोबरचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 4:23 PM

कतरिनाबरोबरचा फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून भाईजानच्या दबंगबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात सलमानबरोबर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. 

सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन कतरिनाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. "हॅपी दिवाली" असं कॅप्शन सलमानने या फोटोला दिलं आहे. 'टायगर ३'च्या प्रमोशनसाठी सलमानने हा फोटो शेअर केला आहे. पण, कतरिनाबरोबरचा फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

"लग्न न करताच बायकोसारखं फिलिंग सलमानने घेतलं आहे," अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "एक सेकंदसाठी मला वाटलं की भाईने वहिनींना सेट केलं की काय," असं म्हटलं आहे. "भाई अजून विसरलेला नाही," अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. "कतरिना वहिनींनी अजून कमेंट केलेली नाही," असंही एकाने म्हटलं आहे. 

दरम्यान, १२ नोव्हेंबरला 'टायगर ३' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मनीष शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सलमान आणि कतरिनाबरोबर इमरान हाशमी,रिधी डोग्रा, आशुतोष राणा या कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

टॅग्स :सलमान खानकतरिना कैफ