‘या’ कारणामुळे सलमान खानने साइन केला ‘रेस-३’, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 11:52 AM
सुपरस्टार सलमान खानचा ‘रेस-३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करण्याची शक्यता आहे.
सुपरस्टार सलमान खान जेव्हापासून ‘रेस-३’या चित्रपटाशी जोडला गेला तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे. आपल्या भूमिकेविषयी सलमानने सांगितले होते की, चित्रपटात माझी भूमिका पॉझिटीव्हही नाही अन् निगेटीव्हही नाही. माझी ‘रेस-३’मध्ये भूमिका आहे, मात्र त्यास ‘हम आपके हैं कोन’चा टच दिला आहे. सलमानच्या मते, चित्रपटाच्या कथेने मला असे काही जखडून ठेवले होते की, माझ्याकडे चित्रपट साइन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सलमानने म्हटले की, ‘चित्रपटाचे निर्माते रमेश तोरानी यांनी मला चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून दाखविली. मला ती खूपच आवडली. मी कथेत काही बदल करण्यास सुचविले. ज्याकरिता ते तयार झाले, यापद्धतीने मी या चित्रपटाशी जोडला गेलो. अॅक्शन पॅक चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेला सलमान सांगतो की, या चित्रपटात ट्विस्ट आणि टर्न भरपूर आहेत. परंतु चित्रपटाला ‘हम आपके हैं कौन’चाही टच आहे. त्यामुळे चित्रपटात फॅमिली अॅँगल प्रेक्षकांना बघावयास मिळतो. जेव्हा सलमानला विचारण्यात आले की, दोन सीक्वल हिट झाल्यामुळे तुझ्यावर याबाबतचा दबाव आहे काय? त्याचे उत्तर देताना सलमान म्हणतो की, माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. आम्हाला स्क्रिप्टवर पूर्ण विश्वास आहे. हा एक चांगला अॅक्शन एंटरटेनर चित्रपट आहे. चित्रपटाची कास्ट जबरदस्त असल्याने आम्ही अधिक निश्चिंत आहोत. पुढे सलमान सांगतो की, ‘रेस-३’मध्ये पहिल्या दोन्ही चित्रपटांपेक्षा अधिक आणि चांगले अॅक्शन सीन आहेत. त्यासाठी संपूर्ण टीमने कठोर ट्रेनिंग घेतली आहे. मी, अनिल, बॉबी, साकिल सलीम, जॅकी आणि डेजी आम्ही सर्वांनाच ट्रेनिंग घ्यावी लागली. काही वर्षांपूर्वी सलमानने निगेटिव्ह भूमिका करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला काहीसा असाच टच देण्यात आला आहे. याविषयी जेव्हा सलमानला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, ‘मला हीरो म्हणूनच लोकांचे मनोरंजन करायचे आहे. ‘रेस-३’मधील भूमिकेविषयी सांगायचे झाल्यास, चित्रपटात माझी निगेटीव्हही भूमिका नाही अन् पॉझिटीव्हही भूमिका नाही. चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना तेव्हाच कळेल जेव्हा ते चित्रपटगृहात जातील.