Join us

Salman Khan: सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरात चोरी, पोलिसांनी आरोपीला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 17:40 IST

अर्पिताच्या घरातून लाखो रुपये किमतीचे हिऱ्याचे कानातले चोरीला गेले आहे आहेत.

Arpita Khan House: सलमान खानची बहीण अर्पिता खानबद्दल एक मोठी बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या मुंबईतील घरात चोरी झाली आहे. अर्पिताच्या घरातून लाखो रुपये किमतीचे हिऱ्याचे कानातले चोरीला गेले आहे आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कानातले चोरीला गेल्यानंतर अर्पिता खानने मुंबईतील खार पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. अर्पिताने आपल्या तक्रारीत सांगितले की, त्या घरातून चोरीला गेलेल्या कानातल्यांची किंमत 5 लाख रुपये आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आणि त्याच रात्री आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या घरातील चोरी तिच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने केली होती. ज्याचे वय ३० वर्षे सांगितले जात आहे. संदीप हेगडे (३०) नावाच्या व्यक्तीने १६ मे रोजी सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या घरातून हिऱ्याचे कानातले चोरले होते.

अर्पिता खानने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले आहे. दोघेही दोन मुलांचे पालक आहेत. आयुष शर्मा सध्या बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात आहे. तो अखेरचा सलमान खानसोबत 'अंतिम' चित्रपटात दिसला होता. 

टॅग्स :सलमान खान