Join us

आईच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होती अर्पिता, अशी बनली खान कुुटुंबाची सर्वात लाडकी लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:30 IST

सलमान खानची सर्वात लहान बहीण आणि खान कुटुंबातली सर्वात लाडकी लेक अर्पिता खान हिचा आज वाढदिवस.

ठळक मुद्दे2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शर्मासोबत लग्न केले.

सलमान खानची सर्वात लहान बहीण आणि खान कुटुंबातली सर्वात लाडकी लेक अर्पिता खान हिचा आज (1  ऑगस्ट) वाढदिवस. 1  ऑगस्ट 1989 रोजी अर्पिताचा जन्म झाला. अभिनेत्री हेलन यांनी सलीम खान यांच्याशी लग्न केल्यावर एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. ही दत्तक मुलगी म्हणजेच अर्पिता.अर्पिताच्या आईचा फुटपाथवर मृत्यू झाला. चिमुकली अर्पिता फुटपाथवर आईच्या पार्थिवाशेजारी बसून रडत होती. अचानक सलीम खान यांची नजर या मुलीवर गेली. याचक्षणी त्यांनी व हेलन यांनी या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.

अर्पिताचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. यानंतर फॅशन कोर्स करण्यासाठी तिने लंडन स्कूल आॅफ फॅशनमध्ये प्रवेश घेतला. लंडनमधून शिकून ती मुंबईला परतली आणि यानंतर येथील एका इंटिरियर डिझाईनर फर्ममध्ये नोकरी करू लागली.

अर्पिता एकेकाळी अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. हे नाते बरेच काळ चालले. पण अचानक दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शर्मासोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. त्याचे आजोबा केंद्रीय मंत्री होते. त्याचे वडील अनिल शर्मा एक ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सध्या ते भाजपात आहेत.

अर्पिता व आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे. अलीकडे आलेल्या एका बातमीनुसार, अर्पिता लवकरच दुस-यांदा आई होणार आहे. अर्थात अद्याप अर्पिता वा आयुष यापैकी कुणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

टॅग्स :अर्पिता खानसलीम खान