सलमान खानला त्याच्या फॅन्सनी किती भरभरून दिलं आणि देतात काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचे जगभरात फॅन्स आहेत. सलमान खान हा मनापासून मैत्री करण्यासाठी ओळखला जातो. त्याचे मैत्री निभावण्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. नुकताच तो याबाबतीच बोललाय. त्याने सांगितले की, मैत्री करायला फार वेळ लागतो आणि त्याचे सर्वच मित्र २०-३० वर्षे जुने आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका न्यूज चॅनलसोबत बोलताना सलमानने सांगितले की, त्याला मित्र बनवायला फार वेळ लागतो. त्यामुळे त्याचे सर्व मित्र २० ते ३० वर्षे जुने आहेत. जे नवीन लोक येतात तेही आहेतच, पण तेवढे जवळ नसतात जेवढे त्याचे ४-५ मित्र आहेत.
स्ट्रॉन्ग रिलेशनशिप्सची गरज नसते
सलमान म्हणाला की, आधी तर सगळे लोक चांगले वाटतात आणि नंतर तुम्हाला एकमेकांमधील कमतरता कळू लागतात. जर तुम्हाला कमतरतेची अडचण नसेल तर ठीक आहे. कारण त्यांचे गुण त्यांच्या कमजोरींपेक्षा हजारो पटीने जास्त असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्या कमजोरी स्वीकारल्या तर तुम्हाला त्यांच्यापासून अडचण होत नाही. तेच जर कमजोरी स्वीकारता आल्या नाही तर मैत्रीचं नातं फार स्ट्रॉंग होऊ शकत नाही. अशात तुम्हाला अशा रिलेशनशिपची गरज नसते. सलमान म्हणाला की, हळूहळू लोक आपापल्या मार्गावर निघून जातात. एका पॉइंटनंतर ते तुमच्या नजरेपासून दूर होता आणि नंतर डोक्यातून दूर होतात.
छोट्या गोष्टींवर लगेच अपसेट होतो
सलमानने यावेळी त्याच्या रागावरही मोकळेपणा भाष्य केलं. त्याने हे मान्य केलं की, त्याला राग येतो आणि हेही म्हणाला की गरजेचा असतो. त्याच्यानुसार, राग येणं चुकीचं नाही. तो रागीट नाही पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे वैतागतो. जसे की, कुणी उशीरा आलं किंवा शूटींग वेळेवर सुरू झाली नाही. तो लोकांना म्हणाला की, आपल्या आजूबाजूला जे आहे त्यासाठी नेहमीच आभारी राहिलं पाहिजे.