Join us

Salman Khan : थकल्या-भागल्या सलमानला पाहून वाढलं चाहत्यांचं टेन्शन, म्हणाले, माझा हिरो म्हातारा झाला रे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 5:39 PM

Salman Khan : होय, सलमान नुकताच वांद्रे भागातील एका क्लिनिकबाहेर स्पाॅट झाला. पाठोपाठ त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

सलमान खानने  (Salman Khan ) पन्नाशी कधीच ओलांडलीये. अर्थात त्याची क्रेझ अद्यापही कायम आहे. तूर्तास काय तर सलमानचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि यातला सलमान बघून अनेकजण हैराण झाले आहेत. होय, सलमान नुकताच वांद्रे भागातील एका क्लिनिकबाहेर स्पाॅट झाला. पापाराझींनी त्यला नेहमीप्रमाणे लगेच गराडा घातला. पाठोपाठ त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झालेत. मात्र हे फोटो पाहून भाईजानचे चाहते काहीसे टेन्शनमध्ये आले.

सलमानचा उदास चेहरा, वाढलेली दाढी पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली. क्लिनिकमध्ये गेल्याने चाहत्यांची चिंता आणखीच वाढली. सलमान क्लिनिकमध्ये कशासाठी गेला होता, हे ठाऊक नाही. पण थकल्या-भागल्या सलमानला पाहून चाहत्यांची चिंता वाढली आणि त्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स द्यायला सुरुवात केली.माझा हिरो म्हातारा झाला रे, अशी कमेंट एका युजरने केली. अर्थात ओल्ड इज गोल्ड म्हणत या युजरच्या कमेंटला सलमानच्या चाहत्याने लगेच उत्तर दिलं.

सलमानच्या अनेक चाहत्यांनी भाईजानचं कौतुक केलं. सलमान भाई सबसे अलग, इसका स्वॅग ही अलग है, जलवा है भाई का, अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या. सलमान खानच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर लवकरच तो 'किसी का भाई,किसी की जान' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाला फरहाद सामजीनं दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमात पूजा हेगडे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शहनाझ गिल,पलक तिवारी,सिद्धार्थ निगम,व्यंकटेश दग्गुबाती,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल यांचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सलमानचा 'टायगर ३' हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ,इमरान हाश्मी झळकणार आहेत.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड