सलमान खान त्याच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याला लॉरेन्स विश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. सलीम खान यांना मिळालेल्या पत्रात सलमान आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात 'तुमची अवस्था मूसेवालासारखी होईल', असे म्हटले होते. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिले होते. त्यानंतर सलमानची सुरक्षाही वाढवण्यात आली. त्याचा खासगी बॉडीगार्ड शेरा, आर्म सिक्युरिटी होती. त्यानंतर आता सलमानने बुलेटप्रूफ कारही खरेदी केली आहे.
सलमान दिसला बुलेटप्रूफ कारमध्येसोमवारी रात्री सलमान खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. एअरपोर्टवर सलमानने टोयोटा लँड क्रूझर एसयूव्ही (Toyota Land Cruiser SUV) मध्ये स्वॅग एन्ट्री केली. या बुलेटप्रूफ कारची किंमत 1.5 कोटी आहे. carwale.com नुसार, सलमान खानच्या लँड क्रूझरमध्ये 4461 cc इंजिन आहे, ज्याची पावर 262 bhp आहे. SUV फक्त एकाच प्रकारात उपलब्ध आहे जी पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे. ही कार पूर्णपणे आर्मर्ड (armoured)आणि बुलेटप्रूफ असते.
एअरपोर्टवर सलमानला कडक सुरक्षा होती .सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. गँगस्टरकडून धमक्या मिळाल्यानंतर सलमानने आपल्याला स्वसंरक्षणार्थ बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी. २२ जुलै रोजी सलमानने आयुक्तांची भेट घेतली होती. बंदुकीसाठी अर्जही त्यांच्याकडे दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सलमानला बंदूक परवान्यासाठी मुंबई पोलिसांकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.