बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसच्या संकटातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. सलमान खान या लढाईत लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. सलमानने दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या मोफत जेवणाची सोय केली आहे. यामध्ये सलमान खानचे फूड ट्रक जेवण घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सलमानची टीमच नाही तर स्वतः जातीने तो दखल घेत आहे. दरम्यान आता सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत सलमान खान मरून रंगाच्या शर्टमध्ये दिसतो आहे. या व्हिडीओत तो स्वतः फूड टेस्ट करून पाहतो आहे. यासोबतच फूड पॅकिंग कसे केले याची देखील त्याने तपासणी केली. सलमान खानने नियमांचे पालन करत फूड टेस्ट केल्यावर मास्क घातला आणि त्याच्या या कामातील संपूर्ण टीमदेखील नियमांचे पालन करताना दिसली.सलमान खानचे 'बिंग हंगरी' नावाचे फूड ट्रक रस्त्यावर उतरले आहे. याच्यामाध्यमातून हजारो लोकांना जेवण देत आहे. या ट्रकमधून फक्त कोरोना वॉरिअर्सच नाही तर गरीब आणि गरजू लोकांना देखील अन्न दिले जाते.