Join us

सलमान खान घेतोय 'टायगर जिंदा है'साठी अशी मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 7:56 AM

सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट 'टायगर जिंदा है'साठी खास मेहनत घेताना दिसतोय. याचित्रपटात तब्बल 5 वर्षांनंतर सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आपला आगामी चित्रपट 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगसाठी घोडेस्वारीचे धडे गिरवतोय. चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी स्वत: ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे तसेच त्यांने सलमान घोडेस्वारी करतानाचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. न्यूयॉर्कवरुन परतल्यावर थेट सलमान खान घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आला आहे.यशराज बॅनर खाली तयार होणारा हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे. कॅटरिना कैफ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे. कॅटरिनाला एका हॉलिवूड स्टंट डायरेक्टरकडून ट्रेनिंग दिले गेले आहे. {{{{twitter_video_id####{{{{twitter_video_id####}}}}}}}} ALSO READ : IIFA 2017 : Exclusive न्यूयॉर्कमध्ये फुलतोय सलमान खान आणि कॅटरिना कैफचा रोमान्स आयफा पुरस्कार सोहळ्या दरम्यान सलमान खान स्टेजवर परफॉर्म करताना एक सेकंड थांबला होता. त्यांने कॅटरिनाकडे पाहिले आणि म्हणाला, ''ओ सोनेयो, जस्ट चिल टाइगर अभी जिंदा'' यांनतर त्यांने मैंने प्यार क्यों कियामधल्या जस्ट चिल चिल गाण्यावर परफॉर्म केले. तब्बल 5 वर्षांनंतर ब्रेकअप झाल्यावर सलमान आणि कॅटरिना या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. त्यांची ब्रेकअप नंतरची केमिस्ट्री पाहण्यास त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. आयफा अॅवॉर्ड दरम्यान न्यूयॉर्कमध्ये दोघे ही एकत्र फिरताना दिसेल. दोघांची जवळीकता आयफामध्ये बरीच वाढल्याची चर्चा आहे. आयफच्या पत्रकार परिषदेदरम्यान सलमान म्हणाला होता मला आयफा पुरस्कार कधी आहे ते माहिती नाही मात्र कॅटरिनाचा बर्थ डे माझ्या लक्षात आहे. तिचा वाढदिवस हा नॅशनल हॉलिडे म्हणून साजरा करावा असे ही तो पुढे म्हणाला होता.