बॉलिवूडमधील फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूडचा दबंग खान सलमानचाही समावेश आहे. सलमानने त्याच्या सिनेमातील भूमिकेसाठी वजन घटविले व वाढवलेदेखील आहे. याशिवाय तो त्याच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो.
सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तो खूप बारीक होता.त्याने करियरच्या सुरूवातीपासूनच त्याचे लुक्स व फिटनेससोबत प्रयोग केले होते. एका मुलाखतीत सलमानने सांगितले की, माझ्या चित्रपटाच्या सुरूवातीच्या काळात वजन वाढविण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.कारण करियरच्या सुरूवातीच्या काळात मी खूप बारीक होतो. त्यावेळी मला जे खायला मिळायचे ते मी खायचो. मला आठवतंय की मी माझ्या मैंने प्यार किया चित्रपटाच्या सेटवर तीस चपात्या खायचो आणि खूप केळीदेखील खायचो.