बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या घरी कोरोनाची एन्ट्री झाली आहे. भाईजानच्या घरातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात सलमानच्या ड्रायव्हरचाही समावेश आहे. घरातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर सलमानने स्वत:ला आयसोलेट केले आहे. अख्खे खान कुटुंबही क्वारंटाइन झाले आहे. सलमान खान सध्या ‘बिग बॉस’चा 14 वा सीझन होस्ट करतोय.कुटुंबाचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले असून यात सलमानचाही कोरोना रिपोर्ट हा निगेटीव्ह आल्याने खान कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
स्टाफचा आणि ड्रायव्हर दोघांच्याही उपचारासाठी सलमानच त्याचे उपाचाराचा खर्च उचलणार आहे. सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खबरदारी म्हणून बीएमसीने सलमानच्या संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटला सॅनेटाईज केले आहे. तसेच सगळ्यांना घरातच बंदिस्त राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
सलमानच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सलमान खाननेही स्वतःला आयसोलेट केले होते. त्यामुळे सलमानच्या जागी यावेळी विकेंड का वॉरमध्ये कोण झळकणार यावर तर्क वितर्क लावले जात होते. अनेकांनी सलमान कोरोनामुळे यावेळी शू्टिंग करणार नसल्याचे म्हटले तर काहींनी पुन्हा एकदा फराह खान सलमानची जागा चालवताना दिसेल असे म्हटले. पण आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे, बातमीनुसार सलमान खान वीकेंड का वॉरमध्ये दिसणार आहे. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह अल्याने तो शूटिंग करू शकतो. त्यामुळे विकेंड का वॉरमध्ये सलमानच स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात सलमान सुमारे दोन महिने त्याच्या फार्महाऊसवर मुक्कामाला होता. घरात म्हातारे आईवडिल असल्याने त्यांना कोरोनाचा कुठलाही धोका नको, म्हणून जाणीवपूर्वक त्याने स्वत:चा मुक्काम फार्महाऊसवर हलवला होता. मात्र लॉकडाऊनचे नियम शिथील होताच तो घरी परतला होता. शिवाय त्याने कामही सुरु केले होते. शूटींगला परवानगी मिळताच त्याने बिग बॉस 14 चे शूटींग सुरू केले होते. शिवाय ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाच्या शूटींगवरही तो परतला होता. या सिनेमाचे शूटींग लॉकडाऊनमुळेच रखडले होते.
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ दीर्घकाळापासून चर्चेत आहे आणि चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी ईदच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज होणार होता, पण आधी चित्रपटाचे शूटिंग थांबले आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे थिएटर बंद झाले, त्यानंतर रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली .या सिनेमाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही आणि आता २०२१मध्ये ईदच्या निमित्ताने राधे रिलीज होऊ शकतो असे म्हटले जात आहे.