Join us

एकीकडे बिश्नोई गँगकडून धमक्या, तिकडे दुबईतील मोठ्या शोमध्ये सहभागी होणार सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:01 PM

सलमान खान दुबईत जाण्याचं कारण काय? बऱ्याच वर्षांपासून करतोय 'हा' शो

दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्याला जीवघेण्या धमक्या येत आहेत. त्यातच त्याचे जवळचे मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. यानंतर सलमानचीही सुरक्षा वाढवण्यात आली. तरी देखील सलमानने कमिटमेंट पाळत बिग बॉसचं शूटिंग केलं. तसंच तो आता दुबईलाही जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एकीकडे धमक्या मिळत असतानाही सलमान खान त्याच्या वर्क कमिटमेंट्स पाळत आहे. बिग बॉसचं होस्टिंग आणि सिकंदर सिनेमाचं तो शूट करत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार सलमान लवकरच दुबईला रवाना होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दबंग रिलोडेड या त्याच्या इव्हेंटसाठी तो दुबईला जाणार आहे. ७ डिसेंबरला हा इव्हेंट होणार आहे. 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गँगकडून सतत धमक्या येत असतानाही सलमानने आपल्या शेड्युलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या इव्हेंटमध्ये त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, सुनील ग्रोवर, मनीष पॉल हे देखील असणार आहे. याशिवाय सलमान 'सिंघम अगेन' मध्येही कॅमिओ करत असल्याचं समजतंय.  याचंही शूट तो करणार आहे. यामध्ये तो चुलबुल पांडे बनून येणार आहे. 

सलमानला y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. नुकतंच त्याने आणखी एक बुलेट प्रुफ गाडीही मागवली. पोलिसांची तगडी सुरक्षा आणि ४ कमांडो असा सलमानच्या सुरक्षेचा फौजफाटा आहे.

टॅग्स :सलमान खानदुबईबॉलिवूड