Join us

लॉकडाऊनमध्ये सलमान खान मिस करतोय या खास व्यक्तीला, सतत करतो व्हिडिओ कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:55 PM

लॉकडाऊनमुळे सलमान त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर अडकला असून या खास व्यक्तीसोबत त्याची कित्येक दिवसांपासून भेटच झालेली नाहीये.

ठळक मुद्देसलमानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान वांद्रे येथील त्यांच्या घरी एकटेच आहेत. तो त्याच्या वडिलांना प्रचंड मिस करत असून दिवसांतून कित्येक वेळा तो व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी गप्पा मारतो.

अख्ख्या देशात कोरोनाने हैदोस घातला आहे. देशातही कोरोनाचा प्रकोप वाढत असताना सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. सध्या सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊसमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत आहे. पण या सगळ्यात तो एका खास व्यक्तीला खूप मिस करतोय.

भारतात लॉकडाऊन जाहीर व्हायच्या काही दिवस आधी सलमान त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत पनवेल येथील फार्म हाऊसवर गेला होता. त्याचा भाचा अहिलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही मंडळी फार्म हाऊसला पोहोचली होती. फार्म हाऊसवर सध्या सलमानसोबत त्याची आई, बहीण, भाचे आणि काही मित्रमंडळी आहेत. पण सलमानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान वांद्रे येथील त्यांच्या घरी एकटेच आहेत. तो त्याच्या वडिलांना प्रचंड मिस करत असून दिवसांतून कित्येक वेळा तो व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी गप्पा मारतो.

सलीम खान सध्या मुंबईत असून टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही आमच्याकडून जी काही मदत करता येईल, ती करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमच्या घरात काम करत असलेल्या मंडळींना देखील मास्क, सॅनिटायझर दिले आहेत. तसेच गरजूंना जेवणाचे पॅकेट्स देखील देत आहोत.

कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. चित्रीकरण बंद झाले असल्याने इंडस्ट्रीतील ज्युनिअर आर्टिस्टवर उपासमारीची वेळ आली आहे. स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाईटमॅन, प्रोडक्शनशी संबंधित लोकांची सध्या अतिशय भयानक स्थिती आहे. त्यांच्या घरात अन्न शिजवायला देखील नसल्याने त्यांना मदत करण्यासाठी सलमानने १६ हजार कामगारांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.

टॅग्स :सलमान खानसलीम खान