Join us

संगीता बिजलानीला भेटायला सायकलवर जायचा भाईजान, 'हँडसम लूक' वर तरुणी होत्या फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 4:08 PM

संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मग कुठे बिनसलं?

दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Snageeta Bijlani) यांचं एकेकाळी अफेअर होतं. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे नातं तुटलं. मात्र आजही या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या पार्टीतून बाहेर पडताना सलमानने संगीताच्या कपाळावर किस केलं होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. भाईजानच्या आयुष्यात जुनं प्रेम परत आलं अशीही चर्चा झाली. 

संगीताला भेटायला सायकलवर जायचा भाईजान

'गुनाहो का देवता' सिनेमाचं शूट महबूब स्टुडिओमध्ये सुरु होतं. तेव्हा सलमान खान शॉर्ट्स घालून सायकलवर संगीताला भेटण्यासाठी पोहोचला. तेव्हा त्याची खूप चर्चा झाली. सलमान शॉर्ट्स घालून सायकलवर फिरतो हे तेव्हापासूनच पसरलं. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. मात्र नंतर त्यांचं नातं तुटलंच. यामागे अनेक कारणं असल्याची चर्चा आहे.

सलमान खान मुंबईतील के सी-रॉक हॉटेलमध्ये जीम आणि स्विमिंगसाठी जायचा. तिथेच त्याची ओळख सोमी अली या तरुणीशी झाली होती. असं म्हणतात की संगीताने सोमी अली आणि सलमानला हॉटेलमधील एका खोलीत एकत्र पाहिले होते. यानंतरच तिने सलमानशी नातं तोडलं होतं. 

सलमान खानही आजही अनेकदा बांद्रा परिसरात सायकलवर फेरफटका मारतो. पूर्वीही तो कधीही पहाटे बाईक किंवा सायकल घेऊन फिरायचा. तेव्हा त्याच्या लूकवर तरुणी फिदा होत्या.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडरिलेशनशिपदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट