वेंकटेश हा दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने दक्षिणेत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यासोबतच तो काही बॉलिवूड चित्रपटात देखील दिसला आहे. करिश्मा कपूरसोबतच्या त्याच्या अनारी या हिंदी चित्रपटाला तर प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. तकदीरवाला या हिंदी चित्रपटात तर त्याचा कॉमिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. वेंकटेशच्या मोठ्या मुलीचे आर्शिताचे लग्न नुकतेच विनायक रेड्डीसोबत झाले. या लग्नाला दाक्षिणात्य इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.
वेंकटेश आणि बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे फ्रेंड्स आहेत. त्यामुळे सलमान देखील त्याच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत वेंकटेशच्या मुलीच्या लग्नाला जयपूर येथे गेला होता. वेंकटेशची मुलगी आर्शिताचे लग्न जयपूरमध्ये धुमधडाक्यात झाले. या लग्नाचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. याच एका व्हिडिओमध्ये सलमान खान आणि वेंकटेश आपल्याला डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सलमान आणि वेंकटेशच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
सलमान आणि वेंकटेश यांनी सलमानच्या जुम्मे की रात या प्रसिद्ध गाण्यावर ताल धरलेला आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. किक या सलमानच्या चित्रपटातील हे गाणे सगळ्यांचेच प्रचंड आवडते आहे. तसेच या गाण्याचे स्टेप्स देखील फेमस आहेत. सलमान आणि वेंकटेशदेखील या गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहेत. हा डान्स झाल्यानंतर वेंकटेश आणि सलमानने एकमेकांना अलिंगन देखील दिले आहे.
वेंकटेशच्या मुलीच्या लग्नाला बिना कक यांनी देखील उपस्थिती लावली होती. बिना या प्रसिद्ध राजकारणी असून त्या अभिनेत्री देखील आहेत. सलमानच्या मैंने प्यार क्यों किया या चित्रपटात त्यांनी सलमानच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्रामवर या लग्नातील अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
वेंकटेशच्या मुलीच्या लग्नात आपल्याला अभिनेता राणा दुग्गुबती आणि नागा चैतन्या देखील दिसत आहे. राणा आणि चैतन्या हे नवऱ्या मुलीचे चुलत भाऊ असून आपल्या बहिणीच्या लग्नात ते खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.