बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. सलमान खान याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. सलमान हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात राहतो. चाहते त्याच्याबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आतूर असतात. सलमान खान हा इंडस्ट्रीचा स्टार आहे ज्याने शर्टलेस आणि एब्सचा ट्रेंड सुरू केला. पण गेल्या काही दिवसांत सलमानचे काही फोटे आणि व्हिडीओ समोर आले. जे पाहून चाहत्यांना 'दबंग' खानची चिंता वाटत आहे.
सलमान हा मुंबईत लहान मुलांसाठी 'बच्चे बोले मोरेया' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी सलमान खान सोफ्यावर बसलेला असताना त्यावरुन उठताना त्याला आधार घ्यावा लागला होता. शिवाय त्याचं वजनही वाढलेलं दिसलं. पोट पुढे, चेहऱ्यावर सुरकुत्या अशा अवस्थेत तो दिसला. त्याला सोफ्याचा आधार घेताना पाहून चाहत्यांना चिंतेत पाडलं.
आता पुन्हा सलमानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सलमानला जवळचा चष्मा लागल्याचं दिसतंय. व्हिडीओमध्ये दिसतं की, सलमान हा कारमध्ये बसला असून तो चष्मा (Salman Khan Using Reading Glasses) घालून मोबाइलमध्ये काही तरी वाचताना दिसतोय. तर मीडियाला पाहून सलमान खाननं लगेच चष्मा काढला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान खानची दृष्टीही कमकुवत होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. आपला लाडका हिरो आता म्हातारा होतोय हे पाहून चाहत्यांना फारच वाईट वाटतंय. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सलमानला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'सिकंदर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो रश्मिका मंदानासोबत स्क्रिन शेअर करेल. ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. तसेच अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'मध्येदेखील सलमानचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे, पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याशिवाय 'टायगर vs पठाण','दबंग 4' या सिनेमांचीही चर्चा आहे.