सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरली चाहती! आत्महत्येची धमकी देत तासभर घातला धिंगाणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 4:55 AM
बॉलिवूड स्टार्सच्या स्टारडमचे किस्से आपण अनेकदा ऐकलेत. कधीकाळी राजेश खन्ना यांची पांढरी कार उभी असल्यास तरुणी त्या कारचे चुंबन ...
बॉलिवूड स्टार्सच्या स्टारडमचे किस्से आपण अनेकदा ऐकलेत. कधीकाळी राजेश खन्ना यांची पांढरी कार उभी असल्यास तरुणी त्या कारचे चुंबन घ्यायच्या. लिपस्टिकमुळे त्यांची पांढ-या रंगाची कार गुलाबी होत असे. पण ही कहाणी आता जुनी झाली. आताश: सलमान खान व शाहरूख खानच्या घराबाहेर चाहत्यांच्या रांगा लागतात. अनेकदा चाहते हद्द पार करतात. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहायला मिळावी म्हणून कारच्या मागे धावत सुटतात. घराबाहेर तासन् तास ताटकळत राहतात. चाहत्यांचे हे वागणे इथपर्यंत आपण समजूही शकतो. पण गोष्ट जीवन-मरणापर्यंत येते, तेव्हा मात्र साहजिकचं चिंता वाढते. सलमानच्या घरी अलीकडे असेच काहीसे घडले. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ मुंबईत गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. या घराबाहेर कायम चाहत्यांची गर्दी असते. पण या ताज्या घटनेने सलमानही अस्वस्थ झाला.स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, अलीकडे एक चाहती दुपारी साडे बाराच्या सुमारास हातात पेचकससारखी वस्तू घेऊन गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये शिरली. त्यावेळी सिक्युरिटी कमी होती. केवळ दोनच सुरक्षारक्षक तैनात होते. गाडर््सने या मुलीला आत सोडले. पण आत शिरताच ती गॅलेक्सी अपार्टमेंटच्या छताकडे धावत सुटली. यादरम्यान तिने सलमानच्या घराचा दरवाजा ठोठावला. सलमान माझा हसबण्ड आहे, असे जोरजोरात ओरडत तिने एकच धिंगाणा घातला. इतकेच नाही तर आत्महत्येची धमकीही देऊ लागली. या मुलीला खाली उतवण्यासाठी फायर ब्रिगेडला बोलवावे लागले. अनेक प्रयत्नानंतर सलमानसाठी वेड्या झालेल्या या चाहतीला खाली उतरवण्यात आले. तूर्तास ही चाहती कोण, कुठली, याची माहिती मिळू शकली नाही. पण सध्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये तिचीच चर्चा आहे.यापूर्वी अभिनेता वरूण धवन याच्यावरही अशीच स्थिती बेतली होती. एका चाहतीने वरूणला आत्महत्येची धमकी दिली होती. तू माझ्या व्हॉट्सअॅप मॅसेजला उत्तर दिले नाहीस तर मी स्वत:ला संपवेल, या तिच्या धमकीनंतर वरूणला पोलिसांत धाव घ्यावी लागली होती.ALSO READ : एकता कपूरवर का नाराज आहे सलमान अन् सोहेल खान?