Join us

​सलमानला हवीत आणखी दहा हजार चित्रपटगृहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 22:24 IST

देशात चित्रपटगृहांची कमतरता आहे,हे काही आमचे मत नाही, तर मेगास्टार सलमान खानचे मत आहे. देशात आणखी दहा हजार चित्रपटगृहे ...

देशात चित्रपटगृहांची कमतरता आहे,हे काही आमचे मत नाही, तर मेगास्टार सलमान खानचे मत आहे. देशात आणखी दहा हजार चित्रपटगृहे असायला हवीत, असे मत सलमानने व्यक्त केले. देशात चांगले चांगले चित्रपट तयार होत आहेत. त्यामानाने चित्रपटगृहांची संख्या अतिशय तोकडी आहे. देशात आणखी दहा हजार चित्रपटगृहे असायला हवीत. शहराच्या बाहेर सिनेमागृहे उघडली जायला हवीत, असे सलमान म्हणाला. शहराच्या मुख्य भागात रियल इस्टेटच्या आभाळाला भिडलेल्या किमती व अशा अनेक कारणांनी केवळ आॅफिससाठी जागा बळकावण्यावर भर दिला जातो. अशास्थितीत सिनेमागृहे शहराबाहेरच उघडली जाऊ शकतात. माझ्या मते, याठिकाणी अधिकाधिक चित्रपटगृहे बनवली जायला हवीत, असेही तो म्हणाला.