Join us

या अॅक्ट्रेसपासूनच डेब्यु अॅक्ट्रेससाठी अनलकी ठरला सलमान खान?जाणून घ्या कोण आहे ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2017 8:00 AM

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सावन कुमार यांच्या सनम बेवफा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री मारलेली अभिनेत्री म्हणजे चांदनी. पहिलाच सिनेमा ...

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सावन कुमार यांच्या सनम बेवफा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री मारलेली अभिनेत्री म्हणजे चांदनी. पहिलाच सिनेमा अभिनेता सलमान खानसोबत करणारी चांदनी सध्या कुठे आहे असा प्रश्न रसिकांना पडला असेल. सनम बेवफा या सिनेमानंतर काही मोजके सिनेमा करुन चांदनी कुठे गायब झाली असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. तुमच्या मनातील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे या अभिनेत्रीचं खरं नाव चांदनी नसून नवोदिता शर्मा असं आहे.मात्र बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी तिने चांदनी हे नाव ठेवलं. सनम बेवफा आणि सलमानसोबत सिनेमा करुनही चांदनीच्या करियरचे तारे काही चमकलेच नाहीत. या सिनेमानंतर काही मोजक्या सिनेमात तिला काम मिळालं. हिना, उमर 55 की दिल बचपन का, जान से प्यारा, 1942 लव्ह स्टोरी, जय किशन, मिस्टर आजाद, हाहाकार असे सिनेमा तिने केले. मात्र तिला या सिनेमातून आपली स्वतःची वेगळी ओळख आणि अस्तित्व निर्माण करता आलं नाही.त्यामुळेच बॉलिवूडला अलविदा करत परदेशी तरुणासह लग्न करुन 'चांदनी' ऑरलॉडो या शहरात स्थायिक झाली. मात्र तिथंही तिचं बॉलिवूड आणि हिंदी सिनेमावरील प्रेम अजूनही कायम आहे. तिनं आपल्या दोन्ही मुलींची नावं करिष्मा आणि करीना अशी ठेवली आहेत. इतकंच नाही तर 'चांदनी' सध्या ऑरलॉडोमध्ये एक प्रसिद्ध नाव झालं आहे. ऑरलॉडोमध्ये तिनं बरंच नाव कमावलं आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून वेस्टर्न आणि क्लासिकल नृत्याचे घेतलेले प्रशिक्षण चांदनीला नवसंजीवनी देऊन गेलं आहे. ऑरलॉडोमध्ये तिने डान्स इन्स्टिट्यूट सुरु केले असून त्याचे नाव सी-स्टुडिओ असं ठेवलं आहे. इथं ती इंडियन क्लासिकलसह, जॅज, हिपहॉप, लॅटिन आणि मॉर्डन डान्स स्टाईलचे धडे देते. पाच विद्यार्थ्यांसह सुरु झालेल्या या डान्स इन्स्टिट्यूटमध्ये आज शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. डान्सचे धडे देण्यासोबतच चांदनी आंतरराष्ट्रीय स्तरावर डान्स शोमध्येही सहभाग घेते. ऑरलॉडो मॅजिक या राष्ट्रीय बास्केटबॉल टीमसाठी बॉलीवुड मॅजिक नावाने चांदनीने एका इव्हेंटचे आयोजन केले होते. 1999 मध्ये  तिने हार्ड रॉक लंडमध्येही लाइव्ह शो केला होता. विकेंडला वेगवेगळ्या ठिकाणी चांदनीचे क्लासेस असतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये अपयश आलं तरी सातासमुद्रापार आज चांदनीने आपली वेगळी ओळख आणि अस्तित्व निर्माण केले आहे.