Join us

'दोन्ही बाजूने होकार येईल तेव्हा मी लग्न करेन'; अखेर भाईजानला मिळाली लाइफ पार्टनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 17:49 IST

Salman khan: '..तरच मी लग्न करेन'; रजत शर्माच्या शोमध्ये सलमानने केला लग्नाबाबत मोठा खुलासा

 अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या फिल्मी करिअरमुळे जितका चर्चेत येत नसेल तितकी त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा रंगत असते. यात आवर्जुन चर्चा रंगते ती त्याच्या लग्नाची. वयाची ५० पार केलेला हा अभिनेता अजुनही बोहल्यावर चढलेला नाही. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा चाहते त्याला लग्नाविषय़ी प्रश्न विचारतात. मात्र, यावेळी रजत शर्मा यांच्या आज की अदालत या कार्यक्रमात त्याने लग्न कधी करणार हे सांगितलं आहे.

अलिकडेच सलमानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच त्याचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या लग्नाविषयी भाष्य केलंय. सोबतच त्याच्या आई-वडिलांचं लग्नाविषयी काय मत आहे हेदेखील सांगितलं.

रजत शर्मा यांनी अखेर सलमानला लग्नावरुन छेडत तू लग्न कधी करणार आहेस? असा प्रश्न विचारला. त्यावर सलमानने त्याचं मौन सोडलं. "देवाच्या मनात येईल तेव्हा माझं लग्न होईल. आधी लग्नासाठी मी हो म्हणायचो तेव्हा समोरची व्यक्ती नाही म्हणायची. नंतर समोरची व्यक्ती हो म्हणू लागली पण मी नकार देऊ लागतो. आता हे दोन्ही बाजूने होत नाही. जेव्हा दोन्ही बाजूने होकार येईल तेव्हा मी लग्न करेन. अजून वेळ आहे. आता मी ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडेन त्याच व्यक्तीसोबतच मी संसार थाटणार", असं सलमान म्हणाला.

सलमानच्या या प्रश्नावर रजत यांनी पुन्हा एकदा खरोखर तुझा लग्नाचा काही प्लॅन आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर आता माझ्यावर खूप दबाव येतोय. माझे आई-वडील सुद्धा माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकतायेत. त्यामुळे मला थोडंसं दडपण आलंय, असं सलमान म्हणतो.

दरम्यान, आजवरच्या कारकिर्दीत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र, त्यापैकी कोणाशीही त्याने लग्न केलं नाही. यात संगिता बिजलानीसोबत तर त्याचं लग्न ठरुन पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा