दबंग सलमान खानची प्रत्येक गोष्ट खास असते. मग त्याचा अभिनय असो, डान्स असो किंवा त्याच्या हरकती प्रत्येक बाब रसिकांसाठी स्पेशल असते. भाईजान म्हणून रसिकांच्या मनात घर केलेल्या आपल्या या लाडक्या अभिनेत्यावर ते जीव ओवाळून टाकण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. सलमानविषयी रसिकांचं प्रेम इतकं आहे की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास ते उत्सुक असतात.
मग ते त्याचं अफेअर असो, लग्नाच्या चर्चा किंवा मग त्याच्यावर सुरु असलेली कोर्ट केस असो, प्रत्येक विषयात सलमानच्या फॅन्सना रस असतो. अशा अनेक रसिकोत्सुक गोष्टींपैकी एक बाब म्हणजे सलमानचं घर. सलमानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स वांद्रे इथल्या घराबाहेर गर्दी करुन असतात.मुंबईसह देशातील सलमानच्या प्रत्येक डायहार्ट फॅनला त्याच्या या घराचा पत्ता माहितीच असेल.
सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमान एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेतो. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. पण असे असूनही सलमान कोणत्याही मोठ्या बंगल्यात न राहाता वांद्रे येथील गॅलेक्सी अर्पाटमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहातो. सलमान बंगल्यात न राहात फ्लॅटमध्ये का राहातो याविषयी त्यानेच एका चॅट शो मध्ये सांगितले होते. तो म्हणाला होता की, मी माझ्या आई-वडिलांसोबत राहू इच्छितो. त्यांना सोडून मी कुठल्याही बंगल्यात शिफ्ट होणार नाही. एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा हा फ्लॅट मला प्रिय आहे.
कारण याठिकाणी माझे आई-बाबा राहतात. मी लहानपणापासून याठिकाणी राहिलो आहे. या अपार्टमेंटमधील सगळी माणसं मला माझ्या कुटुंबासारखी आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा खालच्या गार्डनमध्ये तासन् तास खेळायचो. अनेकदा तर थकून गार्डनमध्येच झोपायचो. आमच्यासाठी अपार्टमेंटमधील सगळी घरे आमचीच घरे होती. कोणाच्याही घरात जायचो. जेवायचो, खेळायचो. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे घर सोडून मला कुठेच जायचे नाही. मी कायम इथेच राहू इच्छितो.