बॉलिवूड अभिनेता सलमान खान आजकाल आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून टीव्ही शो बिग बॉस 14 सीझनमध्ये होस्ट करतानाही दिसतो आहे. मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान बर्याच मोठ्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. त्याचबरोबर सलमान खान फेब्रुवारीपर्यंत महेश मांजरेकर दिग्दर्शित 'लास्टः द फायनल ट्रुथ' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून आपल्या फ्रेंचायझी सिनेमा 'टायगर -3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान 'अंतिम' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करून 'टायगर -3' च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात सलमान खान आपल्या फ्रेंचायझी सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. सलमान खानच्या या सिनेमात अविनाशसिंग राठोडची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सिनेमात कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत परत येणार आहे. सिद्धार्थ आनंद या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. अलीकडेच सलमान खानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे ज्यात त्याने आपल्या 'राधे' सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
सलमानने लिहिले की, ‘सॉरी … मला सर्व चित्रपटगृहांच्या मालकांकडे लक्ष देण्यास वेळ लागला आणि मी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांची आर्थिक समस्या मी समजू शकतो. यामुळे मी माझा आगामी चित्रपट राधे हा चित्रपटगृहात प्रदर्शित करून त्यांना मदत करणार आहे. सलमानने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची सर्व काळजी त्यांनी घ्यावी. यंदा ईदवर राधे चित्रपट सर्वच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.