Join us

सलमान खान लहान मुलांना देणार हे सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 4:44 PM

अभिनेता सलमान खान लवकरच एका वेब सीरिजची निर्मिती करणार आहे.

ठळक मुद्देसलमान खान लहान मुलांसाठी आणणार वेब शोसलमान खान आगामी चित्रपट 'भारत'च्या चित्रीकरणात व्यग्र

 बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला लहान मुले खूप आवडतात. तो घरी आपला बराचसा वेळ आपल्या भाच्यांसोबत खेळण्यात घालवतो. लहानांसोबत लहान होऊन खेळणाऱ्या सलमानचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. अनेकदा सामाजिक भान जपणाऱ्या सलमानला अनाथ मुलांसोबतसुद्धा काहीतरी स्पेशल करताना स्पॉट केले जाते. आता सलमान लहान मुलांसाठी सरप्राईज घेऊन येणार आहे.

सलमान खान त्याच्या प्रोडक्शनच्या माध्यमातून डिजिटल माध्यमात पदार्पण करतो आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार सलमान लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करत असून तो वेबसीरिजची निर्मिती करणार आहे. तो या वेबसीरिजच्या तयारीला लागला असून त्याने यासाठी उत्तम लेखकांची टीम नेमली आहे. चार वर्षांवरील मुलांसाठी तो सीरिज घेऊन येणार आहे. सलमानला संपूर्ण कुटुंबाचे एकत्रित मनोरंजन होईल, असा शो तयार करायचा आहे. आता सलमान लहान मुले ते मोठ्यांसाठी वेबवर कोणता शो घेऊन येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'भारत'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे.  'भारत' या चित्रपटात कतरिना शिवाय तब्बू आणि दिशा पटानी या अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जूनला प्रदर्शित होईल. 

टॅग्स :सलमान खान