Join us

Chiranjeevi’s Godfather : चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये या एका अटीवर झाली सलमानची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 1:58 PM

Chiranjeevi’s Godfather : होय, साऊथच्या या सिनेमात काम करण्यासाठी सलमानने एक खास अट ठेवली होती. या एका अटीवरच त्याने या हा सिनेमा साईन केला.

सलमान खान (Salman Khan )आणि चिरंजीवी (Chiranjeevi) हे दोन सुपरस्टार लवकरच धमाका करणार आहेत. होय, साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटात सलमान खान दिसणार आहेत. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेलला पोहोचली आहे. खुद्द चिरंजीवीने ‘गॉडफादर’मध्ये सलमानच्या एन्ट्रीची घोषणा केल्यानंतर फॅन्स क्रेझी झालेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान पहिल्यांदाच साऊथ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का की, साऊथच्या या सिनेमात काम करण्यासाठी सलमानने एक खास अट ठेवली होती. या एका अटीवरच त्याने या हा सिनेमा साईन केला.

होय, सलमानची म्हणे एकच अट होती. ती म्हणजे, या चित्रपटासाठी त्याला फी नको होती. मला या चित्रपटासाठी फी नकोय, फी देणार नसाल तरच मी हा सिनेमा करेल, हीच सलमानची अट होती. 

पिंकविलाच्या वृत्तानुसार,  सलमान बॉलिवूडचा सुपरस्टार असल्यामुळे या चित्रपटासाठी साऊथ मेकर्स सलमानला म्हणेल तितकं मानधन द्यायला तयार होते. पण सलमानने एक दमडीही घेतली नाही. हे सगळं कुणासाठी तर फक्त चिरंजीवीसाठी. हा सिनेमा सलमानने फक्त आणि फक्त चिरंजीवीसाठी साईन केला. चिरंजीवीबद्दलचं प्रेम, आदर यामुळे त्याने या चित्रपटासाठी फी घ्यायला नकार दिला.

‘गॉडफादर’ या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा एक पॉलिटिकल अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे. यात सलमान अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. मोहन राजा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. ‘गॉडफादर’शिवाय सलमान खान ‘पठाण’आणि ‘लालसिंग चड्ढा; या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.  सध्या सलमान ‘टायगर 3’मध्ये बिझी आहे .  

टॅग्स :सलमान खानचिरंजीवी