२००३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या 'तेरे नाम' सिनेमाने इतिहास रचला होता. या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाईच केली नाही तर देशातील गल्ली गल्लीत लांब केस असलेला 'राधे मोहन' दिसू लागला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलं होतं. अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी नुकतेच एका मुलाखतीत संकेत दिले की, ते या ब्लॉकबस्टर सिनेमाा सीक्वल बनवू शकतात. त्यांच्या डोक्यात अनेक कथा आहेत. फक्त यावर सलमानसोबत बोलणं बाकी आहे.
'मिड डे'सोबत बोलताना सतीश कौशिक म्हणाले की, 'तेरे नाम'ची कथा जिथे संपली होती. तिथे सीक्वल बनण्याची शक्यता आहे. सतीश कौशिक म्हणाले की, सिनेमाचा हिरो राधे मोहनच्या भूमिकेत असे अनेक कंगोरे आहेत ज्यावर कथा विणली जाऊ शकते. त्यांच्या मनात अशा अनेक कथा आहेत. पण याबाबत ते अजून सलमान खानसोबत बोलले नाहीत'.
सतीश कौशिक म्हणाले की, 'माझ्याकडे काही कथा आहेत. ज्या तेरे नामला पुढे घेऊन जाऊ शकतात. मी एक कॉन्सेप्ट तयार केली आहे. पण सलमान खानसोबत याबाबत अजून बोलणं झालं नाही'. दरम्यान २००३ मध्ये प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या सिनेमात सलमान खानसोबत भूमिका चावला दिसली होती. या सिनेमाच्या शेवटी भूमिका चावलाचा मृत्यू होतो. तर राधे मोहन ठीक असूनही पुन्हा पागलखाण्यात जातो.
सतीश कौशिक सांगतात की, ते सलमान खानचे आभारी आहेत की, तो त्यांचा सिनेमा प्रोड्यूस करतोय. सतीश कौशिक 'कागज' नावाचा एक सिनेमा करत आहेत. ज्यात आझमगढचा एक शेतकरी लाल बिहारी याची कथा आहे. ते म्हणाले की, 'लाल बिहारी हा आझमगढमधील एक शेतकरी आहे. ज्याला अधिकाऱ्यांनी कागदोपत्री मृत घोषित केलं आहे. या सिनेमात अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असेल'.