Join us

सलमानचा भावजी आयुषच्या 'रुसलान'चा ट्रेलर रिलीज, सुनील शेट्टी-जगपती बाबूंची खास भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 17:43 IST

सलमान खानचा भावजी आयुष शर्माचा 'रुसलान' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय. तुम्हीही हा ट्रेलर बघा (ruslaan trailer)

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा विविध सिनेमांमधून सुपरहिट कामगिरी करत आहे. सलमान त्याच्या प्रॉडक्शन संस्थेमधून नवीन चेहऱ्यांना संधी देत असतो. काहीच दिवसांपुर्वी सलमानने त्याची भाजी अलीझा अग्निहोत्रीला 'फर्रे' सिनेमातून लॉंच केलेलं. आता सलमान खानचा मेव्हणा म्हणजेच बहिण अर्पिताचा नवरा आयुषच्या 'रुसलान' या नवीन सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

'रुसलान'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, चित्रपटात साऊथ स्टार जगपती बाबू देखील आहे. ज्यांची व्यक्तिरेखा एका पोलीस अधिकाऱ्याची आहे. रुसलान हा त्यांचा मुलगा आहे. ट्रेलरमध्ये दिसतं की अनेक वर्ष आयुष आणि जगपती बाबू यांनी आपली ओळख लपवली आहे. त्यांच्या कुटुंबावर एक डाग लागला आहे. आणि जर हा डाग काढायचा असेल तर त्यांना पुन्हा युनिफॉर्म चढवावा लागेल. जेणेकरुन दोघेही पिता - पुत्र डोकं वर करुन जगू शकशील. आता हा डाग काय आहे आणि रुसलानची खरी ओळख काय आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

भावजी आयुषच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सलमान खाननेही त्याचं कौतुकही केले. सलमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ट्रेलर शेअर करत लिहिलं, 'आयुष मी पाहू शकतो की रुसलानच्या व्यक्तिरेखेसाठी तू किती मेहनत आणि डेडीकेशन दिलं आहेस. काहीही झालं तरी आपले सर्वोत्तम प्रयत्न करत राहा. मेहनतीला नक्कीच फळ येईल. देवाचे आशिर्वाद आणि शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत." अशा शब्दात सलमानने आयुषचं कौतुक केलं. 26 एप्रिल 2024 रोजी 'रुस्लान' चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतोय.

टॅग्स :आयुष शर्मासलमान खानअर्पिता खान