Join us

​सलमान खानला आवडलेली ‘मुलगी’ कोण, कुठली? असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी आहे ‘ही’ खास बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 4:33 AM

बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान याने काल एक ट्विट करून सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते. ‘मुझे लडकी मिल गई’, असे ट्विट त्याने केले होते. त्याच्या ट्विटनंतर सगळीकडे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. सलमान लग्न तर करत नाहीये ना? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान याने काल एक ट्विट करून सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते. ‘मुझे लडकी मिल गई’, असे ट्विट त्याने केले होते. त्याच्या ट्विटनंतर सगळीकडे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. सलमान लग्न तर करत नाहीये ना? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण हे सस्पेन्स अगदी काही तासच टिकले. होय, ‘मुझे लडकी मिल गई’ या ट्विटनंतर काही वेळातच सलमानने या सुंदर मुलीचा फोटो शेअर केला. ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून सलमानचा मेहुणा आयुष शर्मा याच्या ‘लवरात्रि’ या आगामी सिनेमाची हिरोईन आहे. आयुषसोबत स्क्रीन शेअर करणार असलेल्या या तरूणीचे नाव आहे, वरीना. ही वरीना कोण, कुठली हे काहीही सलमानने सांगितले नव्हते. पण आम्ही मात्र वरीनाबद्दलचे सगळे तपशील तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. वरीनाचे पूर्ण नाव वरीना हुसैन आहे. वरीनाचे वडिल इराकी तर आई अफगाणी आहे. वरीना न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीतून बाहेर पडलेली आहे. यापूर्वी अनेक जाहिरातीत हा सुंदर चेहरा दिसला आहे. २०१३ मध्ये तिने मॉडेलिंग सुरु केले. दिल्लीत राहणारी वरीना अलीकडे मुंबईत शिफ्ट झालीय. आता याचे कारण काय असेल ते तुम्ही जाणताच. होय, बॉलिवूड. अलीकडे वरीना कॅडबरी सिल्कच्या जाहिरातीत दिसली होती. सलमानने हीच जाहिरात बघून वरीनाला आयुष्यच्या अपोझिट कास्ट करण्याचा निर्णय घेतला. एकंदर काय तर एका जाहिरातीने वरीनाची लाईफ बदलली. आता वरीनाचा बॉलिवूडमधला पुढचा प्रवास कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.ALSO READ : भाईजान सलमान खानला‘लडकी मिल गयी’, दबंग खानच्या ट्विटमुळे लग्नाच्या चर्चांना उधाणआयुष व वरीना या दोघांचा ‘लवरात्री’ हा सिनेमा एक लव्हस्टोरी आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या चित्रपटात वरीना एका बेले डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिराज मीनावाला हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवताहेत. आयुषचे तर तुम्हाला ठाऊक आहेच. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा आयुष हा पती. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा होती.