Join us

सलमान खानला का आठवली चिमुकली ‘रवीना’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 10:50 AM

‘रेस’फेम निर्माता रमेश तौरानीची मुलगी रवीना तौरानी हिला पाहून सलमानला तिचे लहानपण आठवले.

सलमान खानने पन्नाशी ओलांडलीय. त्यामुळे साहजिक आज बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणा-या यंग जनरेशनमधील अनेकांना त्याने कधीकाळी अंगाखांद्यावर खेळवले असेल किंवा त्यांच्यासोबत तो खेळला असेल. अलीकडे असेच काही झाले. ‘रेस’फेम निर्माता रमेश तौरानीची मुलगी रवीना तौरानी हिला पाहून सलमानला तिचे लहानपण आठवले. रवीनाने अलीकडे एका व्हिडिओ साँगद्वारे मनोरंजन दुनियेत पाऊल ठेवले. गेल्या वर्षीपासून रवीनाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होती. अखेर रवीनाने शुभ्रो गांगुलीच्या ‘दिल जरा तू सुन’ या सिंगलद्वारे इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. सलमानने रवीनाचे या म्युझिक व्हिडिओला प्रमोट करताना स्वत:च्या सोशल अकाऊंटवर एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. ‘ही रवीना टंडन नाही तर रवीना तौरानी आहे. वेळ कसा निघून जातो, कळतही नाही. ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटावेळी रवीना एक लहानशी मुलगी होती,’असे त्याने लिहिलेय. सलमानने बघितलेली ती चिमुकली आता बरीच मोठी झालीय आणि बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.  सलमान खानने अलीकडे तौरानी फ्रेंचाइजीचा ‘रेस3’ साईन केला आहे. आता असे असताना निर्मात्याच्या मुलीला प्रमोट करणे तर बनतेच. सलमानने तेच केले. निर्मात्याच्या मुलीला अर्थात रवीनाला त्याने प्रमोट केले. अर्थात हे करताना  रवीनाचे बालपणही त्याला आठवले. ALSO READ : कॅटरिना कैफवर अशी काही खिळली सलमान खानची नजर! रवीना स्वत: योग सेंटर चालवते. कुंदन शहाच्या ‘दिल है तुम्हारा’ या चित्रपटात ती बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर सिद्धार्थ आनंदचा ‘बँग बँग’मध्ये ती अस्टिस्टंट डायरेक्टर होती.