बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आजवर सलमानचे विविध अभिनेत्रींशी नाव जोडले गेले. आज बॉलीवुडचा भाईजान सलमान आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याचे सगळे फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. अर्पिता खानवर जितके सलमान प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम भाचा अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. मामा बनल्यापासून सलमान वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. त्यांच्या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर सर्वात जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.
अहिल जन्माला येण्याआधीपासूनच सलमान अर्पिताची खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे अहिलचा जन्म झाला तेव्हा सलमानचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. खास अहिलसाठी त्याने पार्टीचे देखील आयोजन केले होते. सलमान आणि अहिलची बॉन्डींग खूप घट्ट आहे. त्यामुळे आई-वडिलानंतर सलमानचा भाचा अहिल हा त्याच्यासाठी खूप स्पेशल असल्याचे पाहायला मिळते.
आता अर्पिता दुस-यांदा प्रेग्नंट आहे, अर्पिता पुन्हा एकदा बाळाला जन्म देणार आहे. पुन्हा त्यांच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन होणार साहजिकच हे दिवस खान कुटुंबासाठी खास आहेत. सलमान पुन्हा एकदा मामा बनणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी सलमान त्याच्या वाढिदवसाचे जंगी सेलिब्रेशन करतो. मात्र यंदा खास बहिणीसाठी सलमानने पार्टी रद्द केली आहे. सलमान बहीणीसोबत राहू इच्छितो. त्यामुळेच पनवेलच्या फार्महाऊसवरची पार्टी यावेळी होणार नाही. याबदल्यात सोहेल खानच्या घरी एक छोटे सेलिब्रेशन होणार आहे.