Join us

सलमान खानची बहीण अर्पिताच्या घरी असा असेल गणरायाच्या आगमनाचा जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 3:58 PM

काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितले होते की, यंदा लाडक्या गणरायाचे आगमन सलमान खानच्या घरी होणार नाही, तर सलमानची बहीण ...

काही दिवसांपूर्वीच आम्ही तुम्हाला सांगितले होते की, यंदा लाडक्या गणरायाचे आगमन सलमान खानच्या घरी होणार नाही, तर सलमानची बहीण अर्पिता खान हिच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यावेळेस संपूर्ण खान परिवार अर्पिताच्या घरी गणेशोत्सव साजरा करणार आहे. त्याकरिता त्यांनी जल्लोषात तयारीही केली आहे. वास्तविक गेल्या १४ वर्षांपासून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचे आगमन व्हायचे, परंतु यावेळेस अर्पिताच्या घरी बाप्पा येणार असल्याने हा उत्सव अधिक अविस्मरणीय करण्यासाठी संपूर्ण खान परिवार जुटला आहे. विश्वसनीय सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार, यंदा भलेही अर्पिताच्या घरी बाप्पाचे आगमन होत असले तरी, सलमान दरवर्षीप्रमाणे त्याच उत्साहाने सहभागी होणार आहे. यासाठी सलमानने त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. या चित्रपटाची शूटिंग अबुधाबी येथे सुरू होती, आता सलमान खास गणेशोत्सवासाठी मुंबईत परतला आहे. उद्या मुंबईसह सर्वत्र गणपती बाप्पाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. सलमानच्या बहिणीच्या घरी दीड दिवसांच्या बाप्पाची स्थापना केली जाणार आहे. या दीड दिवसांमध्ये सलमानच्या घरी अनेक सेलिब्रिटीं बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हा उत्सव अधिकच स्पेशल होत असतो. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षीची बाप्पाची मूर्ती सारखीच असते. शिवाय मूर्तीभोवती सजविण्यात येणारी आरास बघण्यासारखी असते. सध्या सलमान त्याचे सर्व कामे सोडून आपल्या परिवारासोबत या उत्सवासाठी सज्ज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या घरी मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. या दीड दिवसासाठी सलमानचे घर प्रत्येकासाठी खुले असते. त्याचबरोबर खान परिवारातील गणेशोत्सवाचे यंदाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे सलमाचा भाचा आहिल याचा हा पहिलाच गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे तो या उत्सवाचा कसा आनंद घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.