Join us

​सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ असेल ओम पुरीचा शेवटचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2017 8:17 PM

आपल्या अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण क रणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने निधन ...

आपल्या अभिनयाच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण क रणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. १८ आॅक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे जन्मलेले ओमपुरी यांचा चित्रपट प्रवास ‘घाशीराम कोतवाल’ या चित्रपटाद्वारे झाला. तर त्यांचा अखेरचा चित्रपट सलमान खानचा या वर्षी प्रदर्शित होणारा ‘ट्युबलाईट’ ठरणार आहे. ओम पुरी यांच्या निधनानंतर सलमान खाने ट्विट करून ‘फार दु:ख होतेय, आम्ही एक आदर्श अभिनेता गमावला आहे, ओम पुरी जी यांना श्रद्धांजली’ असे लिहले आहे. सोबतच त्याने दोघांचा ‘ट्युबलाईट’ या चित्रपटातील एक फोटो अपलोड केला आहे. अभिनयात सक्रिय असलेले ओम पुरी यांचे तीन चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यामुळे त्यांच्या अभिनय चाहत्यांना पाहता येणार आहे. १३ जानेवारीला ओम पुरी यांचा ‘रामभजन जिंदाबाद’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा विनोदी चित्रपट असून त्यांच्यासोबत जगदीप. कुलभूषण खरबंदा, अभय जोशी, श्वेता भारद्वाज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत गुप्ता यांनी केले आहे. यानंतर ओम पुरी यांचा दुसरा चित्रपट ‘वाईसरॉय हाऊस’ मार्च महिन्यात प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट ब्रिटीश-इंडियन हिस्टोरिकल ड्रामा असून याला ख्यातनाम दिग्दर्शक गुरिंदर चढ्ढा यांनी दिग्दर्शित केल आहे. या चित्रपटाला ए.आर रहेमान यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे ए.आर. रहेमानचा ६ जानेवारीला आपला वाढदिवस साजरा करीत आहे. या वर्षी रिलीज होणारा ओम पुरी यांचा तिसरा व अखेरचा चित्रपट ‘ट्युबलाईट’ असेल. या चित्रपटात ओम पुरी सोबत सलमान खानची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांने केले आहे. सलामान व कबीर खान यांनी ओम पुरीच्या निधनावर शोक व्यक्त करीत लिहले, ‘काही दिवसांपूर्वी तुम्ही आम्हाला हसताना दिसले होते’ आम्ही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ठ अभिनेता हरविला आहे. 

So sad . Lost one of the most iconic Actors, RIP Om Puri ji