Join us

​कधी होणार सलमान खानचे लग्न? भाईजानने स्वत:चं दिले उत्तर! वाचा, काय म्हणाला सलमान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 9:20 AM

सलमान खान कधी लग्न करणार? हा खूप मोठा प्रश्न आहे. भाईजान आताश: ५१ वर्षांचा झाला आहे. पण अजूनही भाईजानने ...

सलमान खान कधी लग्न करणार? हा खूप मोठा प्रश्न आहे. भाईजान आताश: ५१ वर्षांचा झाला आहे. पण अजूनही भाईजानने अजूनही लग्न केलेले नाही. वयाची पन्नाशी ओलांडूनही भाईजानने लग्न का केले नाही, हे कुणालाही ठाऊक नाही. त्यामुळे सलमान कुठेही जावो,त्याला लग्नाबद्दलचा प्रश्न हमखास विचारला जातोच आणि सलमान हसत-हसत मोठ्या चतुराईने हा प्रश्न टाळताना दिसतो. पण तरिही हा प्रश्न त्याचा पिच्छा सोडत नाही.अलीकडे सलमानला एका मुलाखतीत हाच प्रश्न विचारण्यात आला. यावर भाईजानने उत्तर टाळले नाही तर तो बोलला. होय, लग्न कधी करणार? या प्रश्नावर सलमान चक्क बोलला. अर्थात त्याच्या उत्तराने पुन्हा एकदा अनेकांची निराशा केली. ‘अनेकांना माझ्या लग्नाची चिंता आहे. माझे लग्न जेव्हा व्हायचे तेव्हा होईल. नसेल व्हायचे तर मी आहे तसाच राहिल,’ असे सलमान म्हणाला. त्याच्या या उत्तरावरून तरी सलमानचा तूर्तास लग्नाचा कुठलाही विचार नाही, असे दिसतेय.असे नसते तर लग्नाचा विषय त्याने असा नशीबावर सोडला नसता. कदाचित आता चाहत्यांनीही सलमानला लग्नाबद्दल विचारणे सोडूनच द्यायला हवे. शेवटी सलमानने लग्न केले काय आणि नाही केले काय, तो कायम तरूणींच्या मनावर राज्य करणार आहे.सध्या सलमान खान ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा कॅटरिना कैफसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सध्या सलमानच्या याच चित्रपटावर वादाचे ढग जमू लागले आहेत.  होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटातील झोयाच्या भूमिकेला सेन्सॉर बोर्डाकडून विरोध होण्याची शक्यता आहे. ALSO READ : कॅटरिना कैफमुळे वादात सापडू शकतो ‘टायगर जिंदा है’ ! सेन्सॉर बोर्डाला खटकू शकतो ‘लव्ह अँगल’!!सेन्सॉर बोर्डाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तूर्तास भारत-पाकिस्तान रोमान्स वा रिलेशनशिपवर अनआॅफिशिअली बॅन आहे.  ‘टायगर जिंदा है’मध्ये सलमान खान एका भारतीय एजंटच्या भूमिकेत आहे तर झोया पाकिस्नी गुप्तहेराच्या. पण दिग्दर्शकाने या दोघांमध्ये रोमान्स  दाखवला आहे. सूत्रांच्या मते, सेन्सॉर बोर्डाचा अशा क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरीवर आक्षेप आहे. त्यामुळे या चित्रपटास प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येऊ शकतात.