पूजावर पैशांअभावी योग्य उपचार झाले नसल्याने तिची प्रकृती खूपच खालावली आहे. ती सातत्याने कमजोर पडत आहे. तिच्यात उभे राहण्याचादेखील त्राण उरलेला नाही. तिला या परिस्थितीत बघून अनेकांना तर विश्वास ठेवणे मुश्कील होत आहे की, सलमानसोबत ‘वीरगती’मध्ये झळकणारी हीच काय ती पूजा?}}}} ">अभिनेत्री पूजा डडवाल की मदद के लिए आगे आये @ravikishannpic.twitter.com/gP2bET2c2X— Uday Bhagat (@udaybhagat) March 21, 2018
१५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे सलमानची ‘ही’ अभिनेत्री; मदतीसाठी ‘हा’ सुपरस्टार आला धावून!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 4:25 PM
सुपरस्टार सलमान खानसोबत ‘वीरगती’ या चित्रपटात काम करणारी ही अभिनेत्री गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. तिच्या मदतीसाठी हा सुपरस्टार धावून आला आहे.
सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत ‘वीरगती’ (१९९५) या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल गेल्या काही दिवसांपासून टीबी आणि फुप्फुसाशी संबंधित आजाराचा सामना करीत आहे. पूजाची आर्थिक स्थिती एवढी हलाखीची आहे की, तिच्याकडे उपचाराकरितादेखील पैसे नाहीत. पूजाच्या जवळच्या नातेवाइकांनी सांगितले की, आम्ही आर्थिक मदतीसाठी सलमान खानशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु आतापर्यंत आमचा त्याच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. मात्र भोजपुरी सुपरस्टार रवि किशन हा मदतीसाठी धावून आल्याने नातेवाइकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पूजा गेल्या १५ दिवसांपासून मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयात दाखल आहे, तर हैदराबादमध्ये ‘एमएलए’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या रवि किशनने आपला सहकारी पप्पू यादव याला काही पैसे देऊन मुंबईला पाठविले आहे. पप्पू यादवने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये पूजावर जनरल वॉर्डात उपचार केले जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पूजाने काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओच्या माध्यमातून मदतीसाठी आवाहन केले होते. या व्हिडीओमध्ये पूजाने म्हटले होते की, मला सहा महिन्यांपूर्वीच टीबी हा आजार असल्याचे समजले. मी सलमानसाठी एक व्हिडीओदेखील बनविला होता. जर त्याने माझा हा व्हिडीओ बघितला तर कदाचित तो मला मदत करेल. मी गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयात दाखल आहे. माझ्याकडे उपचारासाठी एक रूपयाही नाही. चहा पिण्यासाठीदेखील मी दुसºयांकडून मदत मागत आहे. याविषयी जेव्हा रवि किशनला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, बºयाच वर्षांपूर्वी मी दिग्दर्शक विनय लाड यांच्या चित्रपटात पूजासोबत काम केले आहे. त्यामुळेच मी पूजाच्या मदतीसाठी पुढे आलो आहे. वास्तविक मी कोणालाच अशा परिस्थितीत बघू शकत नाही. दुसरीकडे पप्पू यादव यांनी मदतीची रक्कम सांगण्यास नकार दिला. त्याने म्हटले की, रवि किशन जेव्हा एखाद्यास मदत करतो तेव्हा तो मागचा-पुढचा विचार अजिबात करीत नाही. तो एकदम खुल्या मनाने मदत करतो. पूजाच्या नातेवाइकांशी जेव्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याकडून समजले की, पूजा गेल्या काही वर्षांपासून गोव्यात एका कॅसिनोची मॅनेजर म्हणून काम करीत होती. पूजाने ‘वीरगती’ व्यतिरिक्त ‘हिन्दुस्तान, इंतकाम, जीने नहीं दुंगी, सिन्दूर की सौगंध’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पूजा डडवाल गेल्या काही काळापासून अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे. पूजाच्या नातेवाइकांनी सांगितले की, आजारपणामुळे पूजाचे पती आणि सासरच्या मंडळींनी तिला सोडले आहे.