सलमान खानचा आगामी चित्रपट 'भारत'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ झळकणार आहे. विशेष बाब आहे की त्या दोघांनी एकमेकांना डेट केलेले आहे. मात्र त्यांचे रिलेशनशीप जास्त काळ टिकू शकले नाही. २०१० साली ते दोघे विभक्त झाले. मात्र त्या दोघांमधील मैत्री कधी संपली नाही. ते एकमेकांची काळजी घेताना पहायला मिळाले आहेत. विशेष करून सलमान. सध्या ते दोघे भारतच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. कित्येक वेळा सलमान कतरिनाला घेऊन असे वक्तव्य करतो की ज्या वरून वाटते की आजही तो कतरिनाला लाइक करतो आहे. नुकतेच भारत चित्रपटातील जिंदा गाण्याच्या लाँचवेळी एका रिपोर्टरने कतरिना कैफला तिच्या भूमिकेबद्दल विचारले आणि सलमानला भाई जान असे संबोधले. त्यावर सलमान म्हणाला की, तुमचा भाई जान हिचा (कतरिना) नाही. यानंतर दुसऱ्या पत्रकाराने विचारले की, जर कतरिना सलमान खानला भाईजान संबोधणार नाही तर ती कोणता जान म्हणेल? यावर सलमानने उत्तर दिले की मेरी जान.
तिच्यासोबत काम केल्यामुळेदेखील सलमान खूप खूश आहे. भारत चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.