बॉलिवूडला अनेक सुपरस्टार लाभले आहेत. ज्यांची हवा आजतागायत कमी झालेली नाही. असेच दोन अभिनेते म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान. दोघांनीही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक चाहता वर्गही बराच मोठा आहे. आतापर्यंत दोघांनी एकत्र अनेक सिनेमांतून काम केलं आहे. दोघांच्या 'करण-अर्जुन' या सिनेमाला लोकांनी खूप पसंत केलं होतं. शाहरुख आणि सलमानच्या जोडीनं पडद्यावर कमाल केली होती. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा एक मजेशीर किस्सा सलमानने एका मुलाखतीत शेअर केला.
सलमान म्हणाला, 'जेव्हा आम्ही करण-अर्जुनसाठी शूटिंग करत होतो, तेव्हा काही कारणांमुळे आम्हा सर्वांना एक खोली शेअर करावी लागली. त्यावेळी सोहेल खानही तिथे उपस्थित होता. शाहरुख पटकन झोपी गेला आणि जोरजोरात घोरायला लागला. त्याच्या घोरण्याचा त्रास होता, तेव्हा मी त्याला बेडवरुन धक्का दिला'. यावर मी घोरत नाही. पण, सायनसचा त्रास झाल्याने घोरलो असेल, असे स्पष्टीकरण शाहरुख दिल्याचे सलमानने सांगितले.
सलमान खान आणि शाहरुख खान स्टारर चित्रपट 'करण-अर्जुन' 1995 मध्ये रिलीज झाला होता. काजोल आणि ममता कुलकर्णी या चित्रपटात अभिनेत्री म्हणून दिसल्या होत्या. राकेश रोशन दिग्दर्शित हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर चित्रपट होता. दिवंगत अभिनेत्री राखी गुलजारने या चित्रपटात सलमान-शाहरुखच्या आईची भूमिका साकारली होती. दिवंगत अभिनेते अमरीश पुरी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले होते.