सलमानला शिक्षा सुनावताच 'या' व्यक्तिला कोसळले रडू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 11:32 AM
सलमान खानला सत्र न्यायालयाकडून पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दांडाची शिक्षा सुनावताच कोर्टात एकच शांतता पसरलीय तर सलमानची ...
सलमान खानला सत्र न्यायालयाकडून पाच वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दांडाची शिक्षा सुनावताच कोर्टात एकच शांतता पसरलीय तर सलमानची बहिण अलविरा ही त्यावेळी ढसाढसा रडू लागली. बुधवारी सलमानच्या दोन्ही बहिणी त्याच्यासोबत जोधपूरला चार्टर प्लेनने आल्या आहे. सलमानसोबतच त्या हॉटेलमध्ये थांबल्या आहेत. सलमान ज्यावेळी कोर्टात आला त्यावेळी त्याच्यासोबत या दोघीही हजर होत्या. सलमानला ज्याक्षणी शिक्षा सुनावली त्यावेळी अलविराच्या भावनांचा बांध तुटला आणि ती ढसढसा रडू लागली. कोर्टरुममध्ये त्याच्या खुर्चीजवळ अर्पिता आणि अलविरा या दोन्ही बहिणी उभ्या होत्या. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच सलमान मान खाली घालून खुर्चीवर बसला. तो अतिशय दु:खी दिसत होता. सलमानला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाने नकार दिला आहेअलविराला सलमान खानची लकी मैस्कॉट मानले जाते. याआधी अनेक कोर्टाच्याच सुनावणीच्या वेळी कोर्टात हजर असायची. 20 वर्षं जुन्या असलेल्या या प्रकरणात नव्याने २० साक्षीदार तपासण्यात आले. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’च्या शूटींगदरम्यान सलमान खान आणि इतर आरोपी तेथील घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. यादरम्यान भवाद गावात २७ आणि २८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. या शिकारीसाठी वापरण्यात आलेले शस्त्र हे विना परवाना असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सलमानवर हरीण शिकारीचे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.ALSO READ : काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने सलमान खानला ठोठावली पाच वर्षांची शिक्षासलमान तुरुंगात गेल्याने बॉलिवूडला जवळपास 550 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सलमान या महिन्यात 'दबंग3'च्या शूटिंगला सुरुवात करणार होता. मात्र जर सलमान खान तुरुंगात गेला असल्याने हे सगळे प्लनिंग फिसकटण्याची शक्यता आहे.