Join us

कन्नड येत नाही म्हणून झाला अपमान, डान्सर सलमान भडकला, म्हणाला, 'पंतप्रधान मोदींना तरी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 9:12 AM

संतप्त सलमानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे. म्हणाला , मी बंगळुरुचा असलो तरी सौदीचा मुलगा?

लोकप्रिय डान्सर, कोरिओग्राफर सलमान युसुफ खानला (Salman Yusuf Khan) बंगळुरु विमानतळावर (Banglore Airport) एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. विमानतळावरील इमिग्रेशन स्टाफने त्याचा कन्नड बोलता येत नसल्याने अपमान केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे संतप्त सलमानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे. तसंच पंतप्रधानांचाही उल्लेख करत त्याने एक वक्तव्य केले. 

सलमानने इन्स्टाग्रामवरुन लाईव्ह व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने सर्व घडलेला घटनाक्रम सांगितला. तो म्हणाला, ' इमिग्रेशन स्टाफ माझ्याशी कन्नडमध्ये बोलत होता. मी बंगळुरुमध्ये जन्माला आलो आहे माझे वडील बंगळुरुचे आहेत तरी मला कन्नड येत नाही असं म्हणत स्टाफने त्याचा अपमान केला. मी बंगळुरुचा आहे म्हणजे मला कन्नड आलीच पाहिजे का. मी लहानपणापासून सौदी मध्येच राहिलो आहे. मी सौदीचा मुलगा आहे. मला आपली राष्ट्रीय भाषा हिंदी येते ते पुरेसं नाही का?'

तो पुढे म्हणाला, 'हे असे अशिक्षित लोक आहेत. असे लोक असतील तर कसा होणार देशाचा विकास? आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना तरी कन्नड भाषा येते का? माझ्याच शहरात आज मला जे काही ऐकून घ्यावं लागलंय त्यामुळे मला प्रचंड राग येत आहे म्हणून मी काही चुकीचे शब्द वापरले. मी करिअरमध्ये जे काही टायटल जिंकले त्याने मी शहराच्या विकासातच हातभार लावला आहे असं मला वाटतं. पण मला हे ऐकून घ्यावं लागत आहे. आता मला या लोकांची तक्रार करायची आहे तर त्यासाठीही काहीतरी ऑनलाईन प्रक्रिया आहे.'

सलमानच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक जणांनी सलमानला पाठिंबा दिला आहे तर काही जणांनी मात्र त्याचं वागणं चुकीचं होतं हे दाखवून दिलं आहे. 'सौदीच्या मुला, तुला जर तुझ्या शहराचा, संस्कृतीचा आदर करता येत नसेल तर हे तुझं शहर नाहीए अशा शब्दात एका युझरने सुनावलं आहे.'

टॅग्स :नृत्यविमानतळसोशल मीडिया