Join us

​सलमानचा जावई आयुष शर्मा ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2017 6:17 AM

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अखेर सलमान आपल्या जावयाला म्हणजे, आयुष शर्माला लॉन्च करण्यासाठी सज्ज झालायं. ...

सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, अखेर सलमान आपल्या जावयाला म्हणजे, आयुष शर्माला लॉन्च करण्यासाठी सज्ज झालायं. सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूड डेब्यू करणार, अशी बºयाच दिवसांपासून चर्चा होती. सलमानने हा जिम्मा आपल्या खांद्यावर घेतला होता. पण आयुषचे लॉन्चिंग बरेच लांबले. मध्यंतरी यावरून अर्पिता सलमानवर नाराज असल्याची खबरही आली. बहीणीची ही नाराजी दूर करण्यासाठी का होईना, आयुषची बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड एन्ट्री होणार आहे. याच्याशीच संबंधित आणखी एक नवी बातमी द्यायची झाल्यास, सलमानने आयुषसाठी एक रोमॅन्टिक फिल्म प्लान केली आहे आणि यात आयुषची हिरोईन बनणार आहे, सारा अली खान.होय, चर्चा खरी मानाल तर, सलमानने आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या एका सिनेमासाठी सारा अली खानशी संपर्क साधला आहे. साराने ही स्क्रिप्ट वाचली आहे. हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. साराला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली असल्याचे कळतेय. खरे तर आयुषचा हा चित्रपट करण जोहर को-प्रोड्यूस करणार, अशीही चर्चा होती. पण ही अफवा असल्याचे कळतेय.आता सारा सलमानचा हा चित्रपट साईन करते वा नाही, हे बघणे औत्सुक्याचे आहे. साराने या चित्रपटाला होकार दिलाच तर आयुष आणि तिची पडद्यावरची केमिस्ट्री बघण्यासारखी असेल. खरे तर साराला पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अमृता सिंह आणि सैफ अली खानची ही लाडकी लेक बॉलिवूड डेब्यू करणार म्हणून बºयाच दिवसांपासून चर्चा आहे. पण या ना त्या कारणाने तिचा डेब्यू लांबतो आहे. आता तरी साराने ही संधी कॅश करावी? होय ना?