Join us

समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 12:53 PM

Samantha Ruth Prabhu: 'माझ्याविषयी पसरलेल्या अफवांमुळे मी खचून जाणार नाही', असंही तिने ठामपणे सांगितलं आहे.

ठळक मुद्देसमंथा आणि नागा चैतन्यने ६ ऑक्टोबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (naga chaitanya) अखेर कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांमध्ये त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. या काळात समंथाविषयी अनेक अफवादेखील पसरल्या होत्या. इतकंच नाही तर तिच्यावर काही आरोपही करण्यात आले होते. मात्र, घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत समंथाने मौन बाळगलं होतं. अखेरच समंथा तिच्यावर झालेल्या आरोपांवर व्यक्त झाली असून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या आरोपांवर व्यक्त झाली आहे.

अलिकडेच समंथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोबतच 'माझ्याविषयी पसरलेल्या अफवांमुळे मी खचून जाणार नाही', असंही तिने ठामपणे सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्यासोबत समंथा राहत होती Live in Relationship मध्ये; ब्रेकअपनंतर केलं नागा चैतन्यबरोबर लग्न

"माझ्या वैयक्तिक आयुष्यात ओढावलेल्या संकटकाळात तुम्ही जो मला भावनिक आधार दिला. तो पाहून मी खरंच खूप भारावून गेले आहे. तुम्ही दाखवलेल्या सहानुभूती, काळजी आणि अफवांपासून माझं संरक्षण केल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. ते सांगतात, माझं अफेअर होतं. मला मूल नको होतं. मी संधीसाधू आणि आणि आता तर मी गर्भपात केला अशी अफवा पसरली आहे. पण, घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत त्रासदायक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण, तुम्हाला मी एक वचन देते, ज्या गोष्टी घडतायेत त्यामुळे आणि ते जे काही बोलतील त्या सगळ्यामुळे मी खचून जाणार नाही", अशी पोस्ट समंथाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिली आहे. 

दरम्यान, समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यात गेल्या कित्येक दिवसांपासून चढउतार सुरु होते. अखेर हे दोघं कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. समंथा आणि नागा चैतन्यने ६ ऑक्टोबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. गोव्यात (goa) मोठ्या थाटात त्यांचा लग्नसोहळा झाला होता. विशेष म्हणजे दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात मोठ्या विवाहसोहळ्यांपैकी त्यांचं लग्न होतं.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodसिनेमाघटस्फोट