साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गतवर्षी नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अचानक चर्चेत आली होती. सामंथा व नागा चैतन्य आता विभक्त झाले आहेत. पर्सनल लाईफमध्ये तरी ही जोडी पुन्हा एकत्र येणारी नाही. पण हो, प्रोफेशनल लाईफमध्ये ही जोडी पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करू शकते.
सामंथा सध्या मायोसिटिस या आजाराला झुंज देतेय. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच ती तिचा आगामा सिनेमा ‘यशोदा’चं प्रमोशनही करतेय. याचदरम्यान एका बातमीने सामंथा व नागा चैतन्यच्या चाहत्यांमध्ये ‘चैतन्य’ आणले आहे. होय, चर्चा खरी मानाल तर सामंथा तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत एका चित्रपटात दिसू शकते. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, सामंथा व नागा चैतन्य यांनी एका प्रोजेक्टसाठी होकार दिला आहे. अर्थात अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रोजेक्ट नावही गुलदस्त्यात आहे. पण या बातमीने नागा व सामंथाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
सामंथा आजारी असल्यामुळे नागा चैतन्यचं कुटुंब चिंतेत आहे. सामंथाच्या आजारपणाबद्दल ऐकताच नागा चैतन्यने सगळे मतभेद बाजूला ठेऊन आपल्या एकस-वाईफला फोन करून तिची विचारपूस केल्याचं कळते.
काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते. 40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.