साऊथची सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) या ना त्या कारणाने सतत चर्चेत दिसते. कधी पर्सनल लाईफमुळे तर कधी प्रोफेशनल लाईफमुळे ती सतत लाईमलाईटमध्ये असते. तूर्तास सामंथा ट्रोल होतेय. काल सामंथाने मुंबईतील ‘क्रिटिक्स च्वॉइस अवार्ड’मध्ये (Critics Choice Awards 2022) हजेरी लावली. या अवार्डच्या रेड कार्पेटवरचा सामंथाचा हॉट अवतार पाहून सगळेच थक्क झालेत. प्लंजिंग नेकलाईन कोर्सेटसोबत फ्लाई ग्रीन रॅप गाऊन तिने यासाठी निवडला. या ड्रेसमध्ये सामंथा प्रचंड सुंदर दिसत होती. काहींना तिचा हा हॉट अवतार आवडला. पण काहींनी तिच्या ड्रेसची खिल्ली उडवली.
सामंथाचा ड्रेस मागून चांगलाच लांब होता. तिच्या या ड्रेसवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या. घाईघाईत चादर लपेटून आलीस का? अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण इव्हेंटमध्ये पोछा मारतोय तुझा ड्रेस, अशा शब्दांत एका युजरने तिच्या ड्रेसची खिल्ली उडवली. इतका कपडा मागे लावला, त्यापेक्षा तो समोर लावला असता, अशी कमेंट एका युजरने केली.
‘क्रिटिक्स च्वॉइस अवार्ड’साठी सामंथा काल मुंबईत दाखल झाली. विमानतळावर पापाराझींसोबतचा तिचा एक व्हिडीओही यादरम्यान व्हायरल होतोय. मॅडम हिंदी आती है क्या? असा प्रश्न पापाराझी तिला करतात. यावर, थोडा थोडा..., असं उत्तर ती हसत हसत देते.
नागा चैतन्यपासून घटस्फोटाची घोषणा आणि त्यानंतर ‘फॅमिली मॅन 2’ या वेबसीरिज या चित्रपटात तामिळ बंडखोराच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय दाखवणारी सामंथा काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा’या सिनेमातील आयटम साँगमुळे चर्चेत होती.
सामंथा रिअल लाईफमध्ये अतिशय बोल्ड व बिनधास्त आहे. सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. 2017 मध्ये सामंथाने टॉलिवूड सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत थाटामाटात लग्न केलं होतं. पण नुकताच त्यांचा घटस्फोट झाला. त्याआधी सामंथा व साऊथ सुपरस्टार सिद्धार्थसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती.