समंथा रुथ प्रभु(Samantha Ruth Prabhu)पासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्य (Naga Chaitanya)चे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत जोडलं जातंय. दोघांच्या डिनर डेटचे फोटो अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यानंतर दोघांची अफेअरची जोरदार चर्चा आहे. एक्स पतीच्या अफेअरवर आता समंथाना देखील मौन सोडलं आहे.
समंथाने सोडलं मौनआजकाल समंथा देव मोहनसोबत तिचा 'शकुंतलम' चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्यच्या रिलेशनशिपच्या अफवांबद्दल बोलताना, तिने थेट नाही पण त्याच्या विधानात म्हटले की, 'कोण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याची तिला पर्वा नाही.'
द सियासत डेलीच्या रिपोर्टनुसार, समंथा म्हणाली, 'कोण कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे याने मला काही फरक पडत नाही. ज्यांना प्रेमाची किंमत कळत नाही, त्यांनी कितीही लोकांना डेट केले तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. निदान त्या मुलीला तरी आनंद झाला पाहिजे. जर त्याने आपले वागणे बदलले आणि मुलीला न दुखावता त्याची काळजी घेतली तर हे चांगलं होईल.
घटस्फोटाबाबत समंथाने दिली होती प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिने तिच्या घटस्फोटाबद्दल खुलेपणाने बोलली होती. या कपलने त्यांच्या लग्नाच्या चार वर्षानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. ती तिच्या मुलाखतीत म्हणाली, यादरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, नागा चैतन्यसोबत वेगळे झाल्याचा तिला अजिबात पश्चाताप होत नाही, कारण तिने तिच्या लग्नात 100% दिले. मी माझं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिने या लग्नात आपले सर्वोत्तम दिले. नागा चैतन्यसोबतच्या लग्नाबद्दल बोलताना समंथा म्हणाली, मी माझ्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी का लपवू?, मी काही चुकीचं तर करत नाहीये,मग मी उगाच अपराध्यासारखं का राहू. ''मी माझ्या वैवाहिक जीवनात माझे १०० टक्के दिले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मी केल्याच नाहीत त्याची शिक्षा मी उगाच का भोगू?"
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, समंथाचा 'शाकुंतलम' रिलीजसाठी तयारी करत आहेत. हा चित्रपट 14 एप्रिलला हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अभिनेत्री विजय देवरकोंडासोबत 'कुशी' आणि वरुण धवनसोबत 'सिटाडेल'मध्ये सुद्धा दिसणार आहे.