Join us

तू नको, तुझ्या आठवणीही नकोत...! सामंथाने नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केली ‘ती’ साडी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:40 IST

Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्य वा त्याच्या कुटुंबाची कोणतीही गोष्ट सामंथाला नको असल्याने तिनं हा निर्णय घेतल्याचे कळतेय. कदाचित सामंथाला सासर, लग्न, घटस्फोट याबद्दलच्या आठवणीही नकोशा झाल्या आहेत.

साऊथची सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) हिने नुकताच नागा चैतन्यसोबत ( Naga Chaitanya) घटस्फोट घेतला. या घटस्फोटाची चांगलीच चर्चा रंगली होती. अगदी हा घटस्फोट का झाला इथपासून घटस्फोटानंतरच्या पोटगीपर्यंतच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाकडून सामंथाला म्हणे 200 कोटी रूपयांची पोटगी ऑफर करण्यात आली होती. पण ‘मला तुमचा एक रूपयाही नको,’म्हणत सामंथाने म्हणे ही पोटगी घ्यायला नकार दिला होता. आता लग्नाच्या साडीबद्दलही अशीच चर्चा कानावर येतेय.

होय, सामंथाने म्हणे तिची लग्नाची साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केली आहे. हीच साडी नेसून सामंथाने नागा चैतन्यसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. सामंथाने लग्नात नेसलेली ही साडी नागा चैतन्यच्या आजीची होती.  नागा चैतन्यची आजी डी राजेश्वरी यांनी त्यांच्या लग्नात ती परिधान केली होती. तिचं साडी समांथाने तिच्या लग्नात परिधान केली होती. पण आता सामंथाने ही साडी नागा चैतन्यच्या कुटुंबाला परत केल्याचे कळतेय. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, सामंथाची मैत्रिण क्रेशा बजाज हिने साडी पॉलिश करून दिली.

नागा चैतन्य वा त्याच्या कुटुंबाची कोणतीही गोष्ट सामंथाला नको असल्याने तिनं हा निर्णय घेतल्याचे कळतेय. एकंदर काय तर सामंथाला सासर, लग्न, घटस्फोट याबद्दलच्या आठवणीही नकोशा झाल्या आहेत.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं. जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते. 40 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं. चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी