सामंथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) तिच्या 'पुष्पा'तील आयटम सॉंगमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे नागा चैतन्यपासून घटस्फोट आणि को-स्टारसोबत किसींग सीन देण्यावरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. नुकताच तिने तिच्या रामचरण सोबतच्या किसींगबाबत खुलासा केला आहे. हा किसींग सीन व्हायरल झाला होता. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या 'रंगस्थलम' सिनेमात ती रामलक्ष्मीच्या भूमिकेत होती. तर यात मुख्य भूमिकेत रामचरण(Ram Charan) होता. या सिनेमातील दोघांच्या किसींग सीनची खूप चर्चा झाली होती. पण या सीनचं खरं कारण समोर आलं.
दोघांनीही दिला होता सीन करण्यास नकार
Pushpa फेम सुकुमार (Sukumar) द्वारा दिग्दर्शित 'रंगस्थलम' मध्ये विवाहित असूनही सामंथा रामचरणला किस करते. यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती. पण या सीनमागे एक इंटरेस्टींग स्टोरी आहे. सामंथाने सांगितलं की, मुळात हा किसींग सीन प्रत्यक्षात झालाच नव्हता. ती सगळी कमाल व्हीएफएक्सची होती. सुरूवातीला जेव्हा दिग्दर्शकाने किसींग सीनची आयडिया दिली. तेव्हा दोघांनी सीन करण्यास नकार दिला होता. राम चरण टेंशनमध्ये होता की, अशा सीनमुळे त्याची पत्नी उपासना कामिनेनी कशी रिअॅक्ट करेल. पण दिग्दर्शकाने सीन हवाच म्हणून तगादा लागवा होता. पण दोघांनीही नकार दिला.
कसा शूट केला होता सीन?
सामंथा आणि राम चरणने लिपलॉक सीनसाठी नकार दिल्यावर मेकर्सनी व्हीएफएक्सच्या मदतीने सीन शूट केला. राम चरण आणि सामंथा किस करण्यासाठी एकमेकांच्या जवळ तर येतात, पण किस करत नाहीत. ते काम व्हीएफएक्सच्या मदतीने केलं. सामंथा म्हणाली की, सीनमध्ये गालावर केवळ टच होता, लिपलॉक नाही. पण पडद्यावर हेच प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं. त्यामुळे ती ट्रोल झाली होती.
सामंथा पुढे म्हणाली की, 'मला माहीत आहे की, लोक शिव्या देत होते. त्यांचं मत होतं की, मी लग्नानंतरही कसा किसींग सीन देऊ शकते. पण जर विवाहित सुपरस्टार असंच करत असतील तर त्यांनाही असाच प्रश्न विचारतील का लोक? मी एक मुलगी आहे म्हणून मला प्रश्न? माझा परिवार मला सपोर्ट करतो. खासकरून माझे सासरे. दरम्यान अशी चर्चा सुरू आहे की, सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाचं कारण 'फॅमिली मॅन २' आहे. या वेबसीरीजमध्ये सामंथाने बोल्ड सीन दिले होते. जे तिच्या पतीला आवडले नाहीत.