Join us

समंथाचा 'शाकुंतलम'ची रिलीज डेट ढकलली पुढे, आता या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 8:06 PM

Shakuntalam Movie : 'शाकुंतलम'मध्ये सामंथा प्रभू शकुंतलेच्या रूपात येणार आणि सर्वांवर मोहिनी घालणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असल्याने शकुंतलेला पहायला प्रेक्षकही उत्सुक आहेत.

'शाकुंतलम'मध्ये सामंथा प्रभू शकुंतलेच्या रूपात येणार आणि सर्वांवर मोहिनी घालणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू असल्याने शकुंतलेला पहायला प्रेक्षकही उत्सुक आहेत. शकुंतला येण्यापूर्वी 'शाकुंतलम'मधील 'मल्लिका मल्लिका...', 'येलेलो येलेलो...' ही गाणीही रिलीज करण्यात आली. कारण शकुंतला १७ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये अवतरणार होती, पण आता ते शक्य नाही. कारण हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. 

प्रदर्शनाची सर्व तयारी सुरू असताना आणि केवळ सात दिवस उरले असताना असं काय घडलं की 'शाकुंतलम'ची तारीख पुढे ढकलावी लागली याबद्दल अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही, पण यामुळे सिनेप्रेमींचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुलगी या चित्रपटात राजकुमारीच्या भूमिकेत आहे. याखेरीज देव मोहन दुश्यंत बनला आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. 

'शाकुंतलम'मध्ये सामंथा रुथ प्रभू, देव मोहन, अल्लू अर्हा, सचिन खेडेकर, कबीर बेदी, डॉ. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागल्ला, जिशू सेनगुप्ता यांच्याशिवाय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

'शाकुंतलम' चित्रपटाची कथा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांच्या दंतकथेपासून प्रेरित असून महान कवी कालिदासाच्या 'अभिज्ञान शकुंतलम' या संस्कृत नाटकातून घेण्यात आली आहे. या चित्रपटात सामंथाने मेनका आणि विश्वामित्र यांची मुलगी शकुंतलाची भूमिका साकारली होती. गुणशेखर निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी