Join us

रिया चक्रवर्तीची चौकशी करणारा NCBचा हा अधिकारी आहे मराठी अभिनेत्रीचा पती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 4:22 PM

 सुशांत सिंग राजूपत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) एक टीम शुक्रवारी रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी धडकली. 

ठळक मुद्देमुंबईतील सर्वात कडक अधिकारी म्हणून समीर वानखडे यांना ओळखले जाते.जॉइंट डायरेक्टर समीर वानखेडेंनी अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रामगोपाल वर्मासह बॉलिवूडच्या अनेकांच्या घरी छापेमारी केली आहे.

 सुशांत सिंग राजूपत प्रकरणात ड्रग्ज  अँगल समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) एक टीम शुक्रवारी  रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी धडकली.  शुक्रवारी सकाळी एनसीबीची टीम रिया चक्रवर्तीच्या मुंबई येथील घरी पोहचली. या टीममध्ये सामील एका अधिका-याचे नाव ऐकून बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. हा अधिकारी कोण तर समीर वानखेडे. 

 मुंबईतील सर्वात कडक अधिकारी म्हणून समीर वानखडे यांना ओळखले जाते. अनेकांना ठाऊक नसेल पण कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे समीर वानखेडे यांचे सिनेसृष्टीशीही खास नाते आहे. होय, त्यांची पत्नी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठी अभिनेत्री आहे. समीर हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती आहेत.  मार्च 2017 मध्ये क्रांती व समीर यांनी लग्नगाठ बांधली होती.

समीर यांनी या सेलिब्रिटींनाही दिला आहे दणकाजॉइंट डायरेक्टर समीर वानखेडे  सेलिब्रिटींना भाव देत नाही. त्यांनी अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रामगोपाल वर्मासह बॉलिवूडच्या अनेकांच्या घरी छापेमारी केली आहे. 2013 मध्ये बॉलिवूड सिंगर मिका सिंग याला मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिका-यांनी परदेशी चलनासह पकडले तेव्हा समीर वानखेडे यांनीच त्यांच्यावर कारवाई केली होती. समीर २००४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई एअरपोर्टवर कस्टम अधिकारी म्हणून झाली होती. ते आंध्र प्रदेश आणि दिल्लीमध्येही सेवेत होते. समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखील दोन वर्षात सुमारे 17 हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. नुकतेच समीर वानखेडे यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. 

क्रांतीने मराठीसोबतच ‘गंगाजल’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात तिने अपूर्वा कुमारीची भूमिका निभावली होती.  जत्रा  सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने आॅन ड्युटी 24 तास, माझा नवरा तुझी बायको, नो एन्ट्री पुढे धोका आहे यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. क्रांती आता सिनेइंडस्ट्रीत तितकीशी सक्रिय नाही. मात्र सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीक्रांती रेडकर