बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली समीरा तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे.तिने नुकताच स्वत: चा एक फोटो शेअर केला, शेअर केलेल्या लूकमध्ये प्रचंड बदल झाल्याचे पाहायला मिळते. आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. फिट राहावं यासाठी समीरा बरीच मेहनत घेते. समीरा रेड्डीने बरेच वजन कमी केले आहे. गेल्याकाही महिन्यापासून ती नियमित व्यायाम करून स्वत: ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
समीरा रेड्डीने दोन फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. त्यामध्ये तिच्यात झालेला बदल पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. सुट्टी असली तरी ती समीरा आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. तिच्या या कठोर मेहनतीमुळेच आज तिने नवीन लूक मिळवला आहे. सुंदर दिसण्याबरोबर फिट राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे हेच समीराच्या या फोटोंवरुन स्पष्ट होते.
समीरा रेड्डीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिचे पोट थोडेसे बाहेर दिसत आहे. त्याच वेळी, दुसर्या फोटोमध्ये पोट आत दिसत आहे. फोटो कोलाज शेअर करताना समीरा रेड्डीने एक भलीमोठ पोस्ट शेअर करत वजन घटवण्यासाठी तिने काही टीप्सही दिल्या आहेत. याच टीप्सनुसार तिने स्वःचे वजन कमी केले आहे. तसेच योग्य आहारही तिने यावेळी घेतला यात साखरेचे सेवन न करण्यापासून ते अधूनमधून उपासही केले आहेत.
तसेच समी रेड्डीने सांगितले की, मी वर्कआउट करते आणि मला त्याचे फायदेही दिसत आहेत. अजूनही माझ्या पोटावर थोडी चरबी दिसत आहे. तीही नियमित योगा वर्कआऊट करत जाईल आणि स्लिम ट्रीम लूक मिळेल. मुळात फिटनेसवर भर देणा-या लोकांना पाहून मलाही नेहमीच फिटनेससाठी प्रेरणा मिळत राहिली. वर्कआऊट करत मी चांगला आठवडा घालवल्याचा आनंद नक्कीच आहे. लग्नानंतर समीरा तिच्याखासगी आयुष्यात रमल्यामुळे बॉलिवूड दूर गेली. सोशल मीडियावर तिचे खास क्षणाचे फोटोही पाहायला मिळतात.