अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) आता चित्रपटांपासून दूर तिच्या संसारात रमलीये. सध्या समीरा बॉडी पॉझिटिव्हीटीवर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आता काय तर समीराने पांढ-या केसांवर पोस्ट शेअर केली आहे. तू तुझे पांढरे केस रंगवत का नाहीस? असा वडिलांना तगादा आहे. पण कदाचित समीराला केस काळे किंवा पांढरे यानं काहीही फरक पडत नाही. आता ती काहीही लपवू इच्छित नाही.
समीरानं एक फोटो शेअर करत याला उत्तर दिलं आहे. ती म्हणते, ‘तू तुझे पांढरे केस लपवत का नाहीस, असा प्रश्न वडिलांनी मला केलाय. कदाचित माझ्या पांढऱ्या केसांमुळे ते चिंतीत आहे. पण मला आताश: काहीही फरक पडत नाही. आधी मलाही त्रास व्हायला. एकही पांढरा केस दिसला की, मी केस रंगवायचे. अगदी दर दोन आठवड्यांनी केस रंगावयचे. पण आता मला अजिबात त्रास होत नाही. आता केस रंगवायचे की नाही, याचा निर्णय मी स्वत: घेते. शिवाय अशी मी एकटी नाही. जुने विचार, परंपरा तोडू तेव्हाच आपण बदलू शकतो. आत्मविश्वास कमावला की, कोणत्याही मुखवट्यामागं लपण्याची गरज भासत नाही. माझ्या वडिलांना समजलं आहे. एक वडिल या नात्यानं मी त्यांची चिंता समजू शकते. पण हाच स्वतंत्र असण्याचा आनंद आहे. ’
समीरा रेड्डीने 2014 साली बिझनेसमॅन अक्षय वर्देसोबत लग्नगाठ बांधली होती. समीरा आता दोन मुलांची आई आहे. 2015 मध्ये तिने मुलाला जन्म दिला आणि 2019 साली तिच्या मुलीचा जन्म झाला. 2013 मध्ये प्रदर्शित ‘वरधान्यका’ हा कन्नड सिनेमा समीराचा अखेरचा सिनेमा होता. तेव्हापासून तिचा एकही सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.