Join us

लग्नानंतर ग्लॅमरस बॉलिवूडपासून दूर गेली ही अभिनेत्री, आता सासूबाईंसोबत करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 15:28 IST

२००२ साली 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अभिनेत्री समीरा रेड्डी गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होती. समीरा जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा सर्वांनी तिचा अभिनय पाहून सांगितले की ती खूप पुढे जाईल. आपल्या पहिल्याच म्युझिक व्हिडिओमुळे तिने रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. समीरा रेड्डीने 1997 मध्ये गझल गायक पंकज उधास यांच्या म्युझिक व्हिडिओद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात. त्यानंतर २००२ साली 'मैंने दिल तुझको दिया' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.  समीरा बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये दिसली. 'डरना मना है', 'मुसाफिर,'नो एंट्री','प्लान',' टॅक्सी नंबर 9 2 11 'आणि' दे दना दन ' या सिनेमांमध्ये ती झळकली. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या प्रकाश झाच्या 'चक्रव्यूह'मध्ये ती शेवटीची दिसली होती.

2014 मध्ये समीराने बिझनेसमन अक्षय वर्देसोबत विवाह केला. लग्न झाल्यावर तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. समीरा आणि अक्षय एका अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर समीरा आणि अक्षयने लग्नाचा निर्णय घेतला. मराठमोळ्या पद्धतीने समीराचे लग्न झाले होते. 2015 साली समीराने मुलाला जन्म दिला.

समीरा तिच्या सासूबाईंसोबत मिळून एक यूट्यूब चॅनल चालवते. दोघे मिळून एक कुकिंग चॅनल चालवतात. यावर ती नवीन व्हिडिओ शेअर करत असते. लॉकडाऊन दरम्यान त्याने अनेक व्हिडिओ बनवले, जे व्हायरलही झाले.

टॅग्स :समीरा रेड्डी