Samrat Prithviraj Box Office Collection Day 5: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj ) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 300 कोटी खर्चून बनलेल्या या चित्रपटाकडून अक्षयलाच नाही तर त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड अपेक्षा होत्या. पण प्रत्यक्षात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं सगळ्यांचीच निराशा केलीये. एकीकडे कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या सिनेमानं 5 दिवसांत वर्ल्डवाईड 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसरीकडे अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ला 5 दिवसांत 50 कोटींचा टप्पाही गाठता आलेला नाही. सध्या या 300 करोडी चित्रपटासाठी अक्षयने घेतलेल्या मानधनाची जोरदार चर्चा आहे.
होय, या चित्रपटासाठी अक्षयने किती मानधन घेतलं माहितीये? तर 60 कोटी रूपये. होय, मीडिया रिपोर्टनुसार, अक्षयने या ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकेसाठी तब्बल 60 लाख रूपये वसूल केलेत. पण बॉक्स ऑफिसवर गेल्या 5 दिवसांत अक्कीच्या मानधनाची ही रक्कमही चित्रपट वसूल करू शकला नाही.
माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने या चित्रपटातून डेब्यू केला आहे. यशराज बॅनरच्या या चिचत्रपटासाठी तिने 1 कोटी मानधन घेतलं. संजय दत्तने या चित्रपटात काका कान्हाची भूमिका जिवंत केली आहे. या भूमिकेसाठी संजयनं 5 कोटी मानधन घेतलं आहे. तर चंद्रवरदाई ही भूमिका साकारणाºया सोनू सूदनं 3 कोटींचं मानधन घेतलं.
पाच दिवसांत 48.65 कोटींची कमाईअक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ची पाच दिवसांची कमाई चांगलीच निराश करणारी आहे. 5 दिवसांत या चित्रपटाला 50 कोटीही कमावता आलेले नाहीत. अनेकठिकाणी प्रेक्षक मिळत नसल्याने शो रद्द केले जात आहेत. काल मंगळवारी या चित्रपटाने केवळ 4. 25 कोटींची कमाई केली. त्याआधी सोमवारी या चित्रपटाने 5 कोटींचा बिझनेस केला होता. खरं तर ‘सम्राट पृथ्वीराज’ला टक्कर देणारा कोणताही मोठा सिनेमा सध्या नाहीये. कमल हासनचा ‘विक्रम’ रिलीज झाला आहे. पण त्याचा जोर साऊथमध्ये आहे. पण तरिही ‘सम्राट पृथ्वीराज’ गर्दी खेचण्यात अपयशी ठरला आहे. याऊलट कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या’ रिलीजच्या 19 व्या दिवशीही गर्दी खेचतोय. काल 19 व्या दिवशी कार्तिकच्या सिनेमाने 2 कोटींचा बिझनेस केला. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकू 156.76 कोटींची कमाई केली आहे.